शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 15:57 IST

Bill gates says about climate change : ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी एकच मार्ग आहे. झाडं लावणं आणि  दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं उद्दीष्टापर्यंत पोहोचता येऊ शकतं. 

कोरोनाच्या माहामारी पाठोपाठ भविष्यकाळातील संकंटाबाबत बिल गेट्स यांनी महत्वाची सुचना दिली आहे.  मायक्रोसॉफ्टचे  संस्थापक बिल गेट्स यांनी सांगितले की, ''वातावरणात बदल होण्याच्या समस्येचा उपाय शोधण्याच्या तुलनेत कोरोना माहामारीची समस्या दूर करणं सोपं आहे. वातावरणातील बदलांसाठी उपाय शोधणं हे मानवतेसाठी सगळ्यात चांगलं काम असेल.'' बिल गेट्स यांनी वातावरण बदलाच्या मुद्द्यावर एक पुस्तक लिहिले होते. ज्याचे नाव (How to Avoid a Climate Disaster) जल आणि वायू आपत्ती कशी टाळता येईल असे आहे.  

ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी या पुस्तकाचा आधार घेतला जावा असं म्हणलं जात आहे. बीबीसीला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये गेट्स यांनी सांगितले की, ''वातावरणावरातील बदलांच्या समस्या कमी करून पाहा. पुढच्या ३० वर्षात आपण जे करायला  जाणार आहोत. असा बदल याआधी कधीही झालेला नाही.  ५१ अरब टन ग्रीनहाऊस गॅस वायूमंडळात वाढत आहेत. आपल्याला हा आकडा शुन्यांवर आणायचा आहे.'' 

दरम्यान वायू मंडळात ग्रीन हाऊस गॅस वाढल्यामुळे धरणी गार होत आहे. यामुळे बर्फ वितळण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर आपत्ती येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बिल गेट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी एकच मार्ग आहे. झाडं लावणं आणि  दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं उद्दीष्टापर्यंत पोहोचता येऊ शकतं. खुशखबर! रामदेव बाबांनी शोधला कोरोनाचा रामबाण उपाय; फक्त ३ दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा

बिल गेट्स यांनी सांगितले की, ''वायू उर्जा आणि सौर उर्जेच्या वापरानं इलेक्ट्रिसिटी डिकार्बनाईज केली  जाऊ शकते. पण एकूण ग्रीन हाऊस गॅसच्या उत्सर्जनाचे योगदान ३० टक्के असते. याशिवाय स्टील, सीमेंट्स ट्रांसपोर्ट सिस्टीम, फर्टीलायजर्स निर्मिती डिकार्बनाईज केली जाणं गरजेचं आहे.''

पुढे त्यांनी सांगितले की, ''असे खूप सेक्टर्स आहेत. ज्यांना सध्या डिकार्बनाईज करण्यासाठी आपल्याकडे कोणताही उपाय नाही. सरकारच्या पुढे  जाऊन काम करायला हवं तसंच संशोधन आणि विकासावर पैसै खर्च करावे लागतील.''  काळजी वाढली! अमेरिकेत एकत्र झाले कोरोनाचे दोन स्ट्रेन; हायब्रिड कोरोना अधिक जीवघेणा ठरणार? 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीयBill Gatesबिल गेटस