शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या पोटी खाण्याच्या बेस्ट गोष्टी, आरोग्याला होतात अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 10:15 IST

आज आम्ही तुम्हाला अशा काही सकाळी सेवन करण्याच्या पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने आरोग्याला फायदे मिळतात.

Healthy Diet: आपल्या दिवसाची सुरूवात आरोग्यदायी गोष्टींनी करण्याचे अनेक फायदे असतात. याने पोट चांगलं राहतं पचनासंबंधी समस्या कमी होतात, मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, वजनही कंट्रोलमध्ये राहतं आणि पोटात  चांगले गट बॅक्टेरिया वाढतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही सकाळी सेवन करण्याच्या पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने आरोग्याला फायदे मिळतात. या गोष्टी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. 

पपई

रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असत आणि पोट चांगलं ठेवण्यासोबतच याने इम्यूनिटीही मजबूत राहते. त्याशिवाय पपईमध्ये अॅंटी-ऑक्सिडंटचं प्रमाणही भरपूर असतं. पपई खाल्ल्याने ब्लोटिंगची म्हणजे पोट फुगण्याची समस्याही कमी होते. 

भिवजलेले ड्राय फ्रुट्स आणि दाणे

सकाळी रिकाम्या पोटी जर भिजवलेले ड्राय फ्रुट्स जसे की, बदाम, अळशीच्या बिया किंवा चीया सीड्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.

केळी

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यानेही शरीराला अनेक फायदे मिळतात. केळीच्या सेवनाने एनर्जी वाढते आणि ब्लड शुगर लेव्हलही रेग्युलेट होते. त्याशिवाय केळी खाल्ल्यावर पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.

बडीशेपचं पाणी

रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट बडीशेपचं पाणी सेवन केल्याने पचनतंत्र चांगलं राहतं. तसेच वजन कमी करण्यासही मदत मिळते. हे पाणी प्यायल्याने अपचन आणि पोटातील गॅसही दूर होतो. बडीशेपचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप टाका आणि पाणी उकडून घ्या. हलकं थंड झाल्यावर ते सेवन करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य