शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पालकसारखी दिसणारी 'ही' आरोग्यदायी भाजी, फायदे वाचाल तर रोजच सेवन कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 13:09 IST

केल अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केले जाऊ शकते आणि आपण ते कच्चे किंवा शिजवून दोन्ही प्रकारे खाऊ शकता.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या बुधवारी केल डे साजरा केला जातो. केल ही भाजी अगदी सामान्य दिसत असली तरीदेखील तिचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ही एक हिरवी, पालेभाजी आहे ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. ही संपूर्ण शरीरासाठी आरोग्यदायक आहे. केल अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केले जाऊ शकते आणि आपण ते कच्चे किंवा शिजवून दोन्ही प्रकारे खाऊ शकता.

WebMD नुसार, केल हे एक सुपरफूड आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील रक्त आणि हाडे तयार होण्यासोबतच आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्यात अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, फोलेट आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी देखील असते. केल मोतीबिंदूची समस्या दूर ठेवण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि कर्करोगापासून बचाव करण्यासदेखील मदत करू शकते.

या 5 मार्गांनी करा आहारात सामील

सॅलडकेल तुम्ही सॅलडमध्ये घालूनदेखील खाऊ शकता. यासाठी केल बारीक चिरून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आणि 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. तुम्ही त्यात ऑलिव्ह ऑईल, मूग किंवा हरभरादेखील घालू शकता.

सूपकेलचे सूप खूप चविष्ट आणि आरोग्यदायी असते. हे बनवण्यासाठी केल, 1 मोठा टोमॅटो, 2-3 बीन्स, 1 तुकडा दालचिनी, अर्धा चमचा जिरे आणि मीठ उकळवा. नंतर ते चांगले घेऊन फेटून गाळून घ्या.

चिप्स किंवा पकोडेजर तुम्हाला स्नॅक बनवायचा असेल तर एका भांड्यात बेसन पीठ, थोडी लसूण पेस्ट, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल, मीठ आणि कोथिंबीर टाकून एकत्र करा आणि या पेस्टमध्ये केलची पाने घाला. आता तुम्ही ते तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता.

स्मूदीकेल स्मूदी बनवण्यासाठी एक कप बदामाचे दूध घ्या आणि त्यात 1 मूठभर केळीची पानं घाला. आता त्यात 1 टीस्पून मध, अर्धा केळी, 1 टीस्पून अननस आणि 1 टीस्पून पीनट बटर घालून मिक्स करा. जर मिश्रण जास्त घट्ट झाले असेल तर त्यात आणखी थोडे बदामाचे दूध घालून ते पातळ करू शकता.

पराठाकेल बारीक चिरून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यात मल्टीग्रेन पीठ मिक्स करून पराठा बनवा. गरमागरम पराठे पीनट बटरबरोबर सर्व्ह करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स