शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यातही बदाम-मनुके भिजवून खावेत का? जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 11:37 IST

Soaked Almond Raisins In Winter: हिवाळ्यात बदाम आणि मनुके दोन्ही पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अशात जाणून घेऊया की, बदाम आणि मनुक्यांचं सेवन कसं करावं आणि ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत काय आहे.

Soaked Almond Raisins In Winter: थंडीला सुरूवात झाली की, शरीर गरम ठेवण्यासाठी आणि पोषक तत्व मिळवण्यासाठी भरपूर लोक वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सचं सेवन करत असतात. ड्रायफ्रूट्स हे गरम असतात त्यामुळे भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. बरेच लोक बदाम आणि मनुके रात्री पाण्यात भिजवून ठेवतात आणि सकाळी खातात. बदामाचं सेवन केल्याने थंडीपासून बचाव होतो. तसेच मनुके सुद्धा शरीराला उष्णता देण्याचं काम करतात. हिवाळ्यात बदाम आणि मनुके दोन्ही पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अशात जाणून घेऊया की, बदाम आणि मनुक्यांचं सेवन कसं करावं आणि ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत काय आहे.

थंडीत बदाम - मनुके भिजवून खावेत का?

हेल्द एक्सपर्ट्सनुसार, हिवाळा असो उन्हाळा ड्रायफ्रूट्स भिजवून खाणं अधिक फायदेशीर ठरतं. हिवाळ्यातही तुम्ही बदाम आणि मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी सेवन करू शकता. भिजवलेले बदाम आणि मनुके खाल्ल्याने त्यांचे गुण अनेक पटीने वाढतात. भिजवलेले बदाम खाल्ल्याने वजन नियंत्रित राहतं. बदामात व्हिटॅमिन ई आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट भरपूर असतं ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. तसेच बदामात फायबरही भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलं राहतं आणि अनावश्यक खाणं टाळलं जातं. हिवाळ्यात बदाम आणि मनुके खाल्ले तर शरीराला भरपूर एनर्जी सुद्धा मिळते.

कधी करावं यांचं सेवन?

जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम आणि मनुके खात असाल तर याने शरीराची कमजोरी दूर होते. बदाम आणि मनुके खाल्ल्याने शक्ती वाढते. पचन तंत्र मजबूत ठेवण्यासही बदाम आणि मनुके मदत करतात. ज्या लोकांना बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीची समस्या असते त्यांना रोज भिजवलेले बदाम आणि मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो. या ड्रायफ्रूट्सच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल होण्यासही मदत मिळते. 

भिजवलेले बदाम-मनुके खाण्याचे फायदे

बदाम मेंदुसाठी खूप फायदेशीर मानले जातात. बदामात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असतं जे तुमची स्मरणशक्ती वाढवतं. रोज बदाम खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगलं राहतं. तसेच याने केस आणि त्वचाही चांगली राहते. बदामात आढळणारं व्हिटॅमिन ई एजिंग कमी करून त्वचा चमकदार करतं. तसेच मनुक्यामधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सने एजिंग आणि त्वचेसंबंधी समस्या दूर होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य