शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

उपाशीपोटी बेलपत्र खाण्याचे फायदे वाचाल, तर देवाला वाहण्यासोबतच रोज स्वत:ही खाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:43 IST

बेलपत्राची शरीरातील अनेक अवयव निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि त्यामुळे अनेक आजारांपासून बचावही होतो. चला तर जाणून घेऊ बेलपत्राचे फायदे...

भगवान शिवाला बेलपत्र वाहून पूजा केली जाते. बेलपत्राला मोठं धार्मिक महत्व आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे बेलपत्र आरोग्यासाठीही अनेक दृष्टीनं फायदेशीर ठरतं. बेलपत्रामध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, जे शरीराला आतून मजबूत आणि निरोगी ठेवतात. आयुर्वेदातही याला एक महत्वाची औषधी मानलं आहे आणि अनेक उपचारात याचा वापर केला जातो. जर सकाळी बेलपत्र उपाशीपोटी खाल्ले तर याचे फायदे दुप्पट मिळतात. बेलपत्राची शरीरातील अनेक अवयव निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि त्यामुळे अनेक आजारांपासून बचावही होतो. चला तर जाणून घेऊ बेलपत्राचे फायदे...

१) पोटाच्या समस्या होतील दूर

जर तुम्हाला पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचन होत असेल तर बेलपत्र तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे पचनक्रिया मजबूत करतं. रोज सकाळी उपाशीपोटी बेलपत्र खाल्ल्यास पोटासंबंधी अनेक समस्या दूर करू शकता.

२) हृदयासाठी फायदेशीर

आजकाल भरपूर लोक हृदयरोगांचे शिकार होत असतात. अशात बेलपत्र हे आजार रोखण्यासाठी फायदेशीर ठरतं. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स गुण असतात, जे हृदयरोगांपासून बचाव करतात आणि हृदय मजबूत ठेवतात. नियमितपणे बेलाची पानं खाल्ल्यास हृदयासंबंधी अनेक समस्या कमी केल्या जाऊ शकतात.

३) डायबिटीस होईल कंट्रोल

डायबिटीसच्या रूग्णांसाठी बेलपत्र खाणं फायदेशीर ठरू शकतं. यातील फायबर आणि इतर पोषक तत्वामुळे ब्लड शुगर लेव्हर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. बेलपत्र नियमित खाणं डायबिटीसच्या रूग्णांसाठी एक नॅचरल उपाय ठरू शकतो.

४) इम्यूनिटी वाढते

बेलपत्रामध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिेडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. जर तुम्हाला वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव करायचा असेल आणि निरोगी रहायचं असेल तर नियमितपणे बेलाची पानं खाऊ शकता. 

कसे खाल?

बेलपत्राचा समावेश आहारात करणं खूप सोपं आहे. तुम्ही ही पानं धुवून थेट अशीच खाऊ शकता किंवा याचा काढा बनवू शकता. त्याशिवाय बेलाची पानं मधात मिक्स करूनही खाऊ शकता. असं केल्यास यापासून मिळणारे फायदे अधिक मिळतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य