शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

गूळ आणि पाण्याचं 'असं' करा सेवन, शरीर आतून होईल साफ; रक्तही होईल शुद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:01 IST

Jaggery and Water Benefits: जर तुम्ही गूळाचं सेवन पाण्यासोबत आणि तिळासोबत केलं तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

Jaggery and Water Benefits: गूळाचा वापर अनेकजण साखरेला पर्याय म्हणून करतात. काही लोक गूळाचा चहा पितात तर काही लोक गूळाचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश करतात. आयुर्वेदात गूळाचा एक औषधी म्हणूनही वापर केला जातो. गूळातून शरीराला अनेक आवश्यक मिनरल्सही मिळतात. जर तुम्ही गूळाचं सेवन पाण्यासोबत आणि तिळासोबत केलं तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.गूळ आणि पाणी पिणं हा एक जुना आयुर्वेदिक उपाय आहे. गूळाचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्याल तर शरीराला नॅचरल एनर्जी मिळते. ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. 

गूळाचे पोषक तत्व - कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयरन आणि लोह व झिंक तसेच तांबे यात असतं. व्हिटॅमिनमध्ये फोलिक अॅसिड आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन असतात.

पचनतंत्र साफ होतं

गूळात असलेल्या नॅचरल तत्वांमुळे पचनतंत्र साफ होण्यास मदत मिळते. याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅसची समस्या दूर होते.

शरीर डिटॉक्स होतं - एनर्जी मिळते

गूळ आणि पाणी मिक्स करून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. लिव्हर या पाण्याने हेल्दी राहतं आणि रक्तही शुद्ध होतं. गूळामध्ये अनेक नैसर्गिक तत्व असतात. याचं पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने दिवसभर शरीराला एनर्जी मिळते. थकवाही दूर होतो.

मेटाबॉलिज्म बूस्ट - इन्फेक्शनपासून बचाव

गूळ आणि पाण्याचं सेवन केल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास, चरबी कमी करण्यास मदत मिळते. तसेच गूळामधील अॅंटी-ऑक्सिडेंट आणि मिनरल्सने इम्यून सिस्टीम मजबूत होतं. ज्यामुळे शरीराचा इन्फेक्शनपासून बचाव होतो.

कसं तयार कराल गूळ पाणी?

एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक तुकडा गूळ टाकून चांगल्या प्रकारे मिश्रित करा. हे हेल्दी ड्रिंक सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. काही महिने याचं सेवन केलं तर तुमचं पोटंही कमी झालेलं दिसेल आणि शरीराला इतर फायदेही होतील. जर तुम्हाला गूळ पाण्यात टाकून प्यायचा नसेल तर तुम्ही गूळ असाच खावा आणि मग पाणी प्यावे.

गूळ आणि तिळ सोबत खाण्याचे फायदे

गूळ आणि तिळ सोबत खाण्याचेही शरीराला अनेक फायदे मिळतात. गूळ आणि तिळ सोबत खाल्ल्याने यातील पोषक तत्व दुप्पट होतात. अशात याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊ.

तिळातील पोषक तत्व - तिळामध्ये कॉपर, मॅगनीज, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीशिअम, लोह, झिंक, मोलिब्डेनम, व्हिटॅमिन बी 1, सेलेनियम आणि डायट्री फायबर सारखे पोषक तत्व असतात.

ब्लड शुगर कंट्रोल 

ब्लड शुगर कंट्रोल करण्यास या दोन्ही गोष्टी फार मदत करतात. सोबतच याने तुमची हाडेही मजबूत होतात. त्याशिवाय तुमच्या त्वचेचं आरोग्यही चांगलं होतं. तुम्ही तिळ आणि गूळापासून तयार एक लाडू रोज खावा. शरीर व्हायरल इन्फेक्शनच्या जाळ्यात येणार नाही.

मेटाबॉलिज्म मजबूत होतं

या दोन्ही गोष्टी सोबत खाल्ल्याने तुमचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. हे पोटासाठीही चांगलं असतं. हिवाळ्यात याने सुरक्षा मिळते. कारण दोन्ही गोष्टी उष्ण आहेत. एनीमियाच्या रूग्णांनी जर आवर्जून याचा डाएटमध्ये समावेश करायला हवा. याने दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या तणावही दूर होतो. तिळामुळे तुमच्या शरीराचा एलर्जीपासूनही बचाव होतो. तसेच हे हृदयासाठीही फायदेशीर आहेत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य