शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुधासोबत या पदार्थाच सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 16:00 IST

Health Tips : गुळातील सुक्रोज, ग्लूकोज, आयर्न आणि खनिज आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतात.

Health Tips : काही लोक साधं दूध पितात तर काही लोक त्यात साखर घालून पिणं पसंत करतात. पण कधी तुम्ही गूळ टाकून दुधाचं सेवन केलय का? यावर बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल. पण अनेकांना हे माहीत नसतं की, दुधात साखरेऐवजी गूळ टाकून सेवन करण्याचा अधिक फायदा होतो. खासकरून वजन कमी करण्यासाठी याचा अधिक फायदा होतो. 

गुळातील सुक्रोज, ग्लूकोज, आयर्न आणि खनिज आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतात. यातील मिनरल्समुळे शरीराला वेगवेगळे फायदे होतात. दुधातील कॅल्शिअम आणि गुळातील आयर्न मांयपेशी मजबूत करतात आणि सांधेदुखीपासूनही याने आराम मिळतो.

दूध आणि गुळाचे फायदे

१) दूध आणि गूळ एकत्र सेवन केल्याने डायजेशन म्हणजेच पचनक्रिया सुधारते. गुळाने पचनक्रियेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधासोबत गुळाचा एक छोटा तुकडा नक्की खावा.

२) अस्थमाने पीडित लोकांनाही याने भरपूर फायदा होतो. हवेतील ऑक्सिजनची कमतरता आणि वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. खासकरून हिवाळ्यात शरीर तापमान योग्य ठेवण्यासाठी आणि कफ दूर करण्यासाठी दुधासोबत गूळ खाल्ल्याने फायदा मिळतो.

३) ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या नेहमी होते, ते सुद्धा दूध आणि गुळाचं सेवन करू शकतात. दूध आणि गुळाच सेवन केल्याने सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. दुधात असलेल्या व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम आणि गुळात असलेल्या आयर्नमुळे सांधे मजबूत होण्यासही मदत मिळते. तुम्ही गुळाचा एक तुकडा आल्यासोबतही खाऊ शकता. 

४) शरीरात रक्ताची कमतरता झाली असेल तर गुळाने ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. याने शरीरातील रक्त शुद्धही होतं. गुळात असलेल्या तत्वांमुळे हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं आणि सोबतच शरीराची इम्यूनिटीही बूस्ट होते. ज्या महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्या असते त्यांनाही एक ग्लास दुधासोबत गूळ खाल्ल्याने आराम मिळेल.

५) वजन कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे मध चांगलं मानलं जातं, त्याचप्रमाणे गुळही वजन कमी करण्यास मदत करतो. गूळ हा केमिकल फ्री प्रक्रियेतून तयार होतो. त्यामुळे गुळाला साखरेपेक्षा चांगलं मानलं जातं. जास्तीत जास्त डॉक्टर साखरऐवजी गुळाच्या अधिक वापरावर अधिक जोर देतात. त्यासाठी दररोज झोपण्याआधी गरम दुधासोबत गूळ खावा, याने काही महिन्यातच तुमचं वजन कमी होऊ लागतं.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य