शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

फक्त बीपी, वेट लॉस नाही; तर अनेक गंभीर समस्यांवर फायदेशीर ठरतं कलिंगड खाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 10:47 IST

कलिंगडाचा आहारात समावेश करून तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता.  

(image credit- mayo clinic health,mashed)

उन्हाळ्यात शरीरातील वाढतं तापमान कमी करण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचा आहारात समावेश केला जातो. उन्हाळ्यात कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीस येतात. वेगवेगळ्या आकारात असलेले कलिंगड शरीराला पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरतात.

वरुन टणक दिसणा-या कलिंगडात पाणीच पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात ते आवर्जून खायला हवं. पण या कलिंगडाचे आणखीही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्हाला माहितही नसेल पण कलिंगडाचा आहारात समावेश करून तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता.  

हृदयाच्या आजारांसाठी

हृदयासंबंधी समस्या रोखण्यासाठी कलिंगड उत्तम उपाय आहे. कलिंगड कोलेस्टॉल लेव्हल कमी करतं. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांपासून सुटका होऊ शकते.  ब्लॉकेजची समस्या यामुळे उद्भवत नाही. अनेक घरांमध्ये जेवण झाल्यानंतर कलिंगड खाण्याची पध्दत आहे. तुम्हीसुद्धा जेवण झाल्यानंतर कलिंगड खाऊ शकता.

शरीर हायट्रेट राहतं

कलिंगडात पाणी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगडाचं सेवन लाभदायक ठरतं. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगडाचा आहारात समावेश करावा. कलिंगड ७८% भाग हा गराचा असल्याने ते खाद्य आणि पेय दोन्ही आहे.

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करत असाल तर डाएटमध्ये कलिंगडाचा समावेश करा. कलिंगडातल्या पाण्यानं पोट भरतं. भूक लागत नाही. त्यामुळे तुमचं वजनही वाढत नाही.

केस, त्वचेसाठी

कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते.  व्हिटॅमिन सी मुळे तुमची त्वचा मऊ आणि केस मजबूत होतात. व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. यासाठीच सौंदर्याची काळजी घेण्यासाठी नियमित कलिंगड खाणं तुमच्या लाभदायक ठरू शकतं. 

पचनाच्या समस्या आणि रक्तदाब

कलिंगडामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.  फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अपचन, गॅस अशा समस्या होत नाहीत. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी कलिंगड उपयोगी फळ आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स