शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोटावरील चरबी लवकर दूर करण्यासाठी या भाजीचं नियमित करा सेवन, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 18:20 IST

Belly Fat Reduce : पालक भाजी वजन कमी करण्याच्या प्रोसेसचा वेग वाढवते आणि सोबतच एक्स्ट्रा कॅलरी बर्न करणं सुद्धा सोपं होतं. यासाठी तुम्हाला केवळ रोजच्या डाएटमध्ये एक वाटी पालक भाजीचा समावेश करणं गरजेचं आहे.

Belly Fat Reduce : वजन कमी करण्याचा विषय निघाला की वेगवेगळे डाएट प्लॅन समोर येतात. वेगवेगळ्या एक्सरसाइज आठवू लागतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि एक्सरसाइज निवडण्याची गरज असते. डाएटच्या वेगवेगळे पर्यायांपैकी एक चांगला पर्याय म्हणजे पालक. पालक भाजीच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता.

पालक भाजी वजन कमी करण्याच्या प्रोसेसचा वेग वाढवते आणि सोबतच एक्स्ट्रा कॅलरी बर्न करणं सुद्धा सोपं होतं. यासाठी तुम्हाला केवळ रोजच्या डाएटमध्ये एक वाटी पालक भाजीचा समावेश करणं गरजेचं आहे. याने तुमच्या कॅलरी बर्न करण्यास मदत मिळेल.

पालक भाजीमध्ये कॅलरी नियंत्रित करणारे फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे एक मुख्य तत्व आहे ज्याने वजन कमी करणं सोपं होतं. यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या रिसर्चमध्ये आढळले की, काही महिला तीन महिन्यांपासून वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होत्या. यातील ज्या महिलांनी दररोज साधारण पाच ग्रॅम पालकाचं सेवन केलं, त्यांना वजन कमी करण्यास अधिक मदत मिळाली.

पालक भाजीचा फायदा कसा होतो?

वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारातून कमी कॅलरी घेणं गरजेचं असतं. एक कप पालकमध्ये केवळ ७ कॅलरी असतात. तर फायबरमुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. याने तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे सतत काहीना काही खाऊन शरीरात एक्स्ट्रा कॅलरीही जमा होत नाहीत.

पालकातून तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर मिळत, ज्याने कॅलरी नियंत्रित होतात. त्यामुळे पालक भाजीचा समावेश आहारात करा. तुम्हाला काही दिवसातच याचा फरक बघायला मिळेल. 

पालक भाजीचे इतर फायदे

पालक ही आरोग्यासाठी सर्वात चांगली भाजी मानली जाते. एक कप पालकमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न,  मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ए असतात. यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबही कंट्रोलमध्ये राहतो. रक्तदाबाचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहण्यास पोटॅशिअम महत्त्वाची भूमिका बजावतं.

फायबर असलेल्या पदार्थांमुळे पचनक्रिया चांगली होते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि यामुळेच आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. दिवसातून एक कप पालक तुमची पचनक्रिया मजबूत करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे रोजच्या आहारात पालक भाजीचा समावेश करून तुम्ही वजन करण्यासोबतच आरोग्यही चांगली ठेवू शकता.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य