शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता कोरोना विषाणूंपासून वयोवृद्धांनासुद्धा वाचवणार BCG लस;  'या' राज्यात चाचणीला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 15:19 IST

बीसीजी लसीचे ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंमुळे वाढत असलेला मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. 

कोरोना व्हायरसच्या माहामामारीने संपूर्ण देश प्रभावित झाला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. तामिळनाडूमध्ये बीसीजी लसीचे ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंमुळे वाढत असलेला मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. 

मागील काही दिवसात मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी सांगितले की, बीसीजी लसीचे ६० ते ९५ वयोगटातील लोकांवर प्रयोग करून निरिक्षणाखाली ठेवलं जाणार आहे.  वयस्कर लोकांमध्ये होणारं मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. तामिळनाडूचेआरोग्यमंत्री डॉं. विजय भास्कर यांनी अशी माहिती दिली आहे.

विजयभास्कर यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये कोविड 19 चा मृत्यूदर कमी करण्यासाठी बेसिल-कॅलमेट-गुएरिन (बीसीजी) लसीचे परिक्षण केले जाणार आहे.  नॅशनल इंस्टिट्यूटफॉर रिसर्च इन ट्यूबरकुलोसिस (NIRT) लवकरच या दिशेने आपले कार्यक्रम सुरू करणार आहे. 

बीसीजी ही लस अनेक देशांमध्ये आजारांपासून वाचवण्यासाठी लहान मुलांना दिली जाते. बीसीजी लसीमुळे लहानपणापासूनच रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते.  सध्या ६० ते ९५ वर्ष वयोगटातील लोकांना कोविड 19 मधून रिकव्हर होण्यासाठी ही लस मदतशीर ठरू शकते. 

राज्य सरकारने मागील काही दिवसात वयस्कर लोकांमध्ये बीसीजीचा होणारा प्रभाव लक्षात यांवर अभ्यास करून आयसीएमआरकडून परवागनी मागितली  होती. आयसीएमआरने आता या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. NIRT मध्ये लवकरचे हे ट्रायल सुरू होणार आहे. या चाचणीदरम्यान वयस्कर लोकांवर कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णालयात भरती होण्याची वेळ येऊ नये तसंच मृत्यूदर कमी व्हावा असा दृष्टीकोन असणार आहे.

साधारणपणे गेल्या काही दिवसात मृत्यू झालेल्या लोकांमध्ये वयस्कर लोकांचा समावेश जास्त प्रमाणात आहे. त्यांना डायबिटीस, हाई बीपी आणि हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागल्यामुळे कोरोना संक्रमण होऊन मृत्यूचा सामना करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार बीसीजी लसीपासून कोरोना विषाणूंपासून बचाव होऊ शकते. याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. 

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यTamilnaduतामिळनाडू