(Image Credit : Verywell Fit)
करिना कपूर, दीपिका पादुकोन आणि सारा अली खान या बॉलिवूड अभिनेत्रींचे सोशल मीडियात नेहमीच पायलेट्स एक्सरसाइज करतानाचे फोटो व्हायरल होत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पायलेट्स एक्सरसाइज चांगलीच ट्रेन्डमध्ये आहे. बॉलिवूड अभिनेत्री ही एक्सरसाइज अधिक फॉलो करतात. पायलेट्स वर्कआउटने वेट लॉससोबतच फॅट लॉस आणि बॉडी टोनिंगसाठी मदत मिळते. महिला जर हा वर्कआउट फॉलो करतील तर त्यांच्या लोअर बॉडीतील फॅट कमी होईल.
मांसपेशी मजबूत करण्यासाठी पायलेट्स एक्सरसाइज फार चांगली मानली जाते. पायलेट्स एकप्रकारे बॉडी बिल्डींगची एक टेक्निक आहे. जी मांसपेशी आणि श्वास घेण्याची प्रक्रिया स्ट्रॉंग करते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या एक्सरसाइजचे फायदे.
कशी करतात ही एक्सरसाइज?
एक्सरसाइज सिस्टीम जर्मन एक्सपर्ट जोसफ पायलेट्स ने वर्ष १८८३ मध्ये डेव्हलेप केली होती. याच्या वेगवेगळ्या टेक्निक असतात. चला जाणून घेऊ कशी करतात ही एक्सरसाइज.
स्टॅंडिंग रोल डाउन
सरळ उभे राहून श्वास घेत दोन्ही हात वर घ्या. नंतर श्वास सोडत पुढच्या बाजूने वाकावे. यावेळी पाठ समांतर असावी. आता हात आणि शरीराचा पुढचा भाग सरळ करून मागच्या बाजूने खुर्चीवर बसल्याच्या स्थितीत या. नंतर सरळ उभे रहा आणि हात बगलेत घ्या. ही एक्सरसाइज कमीत कमी ३ वेळा करा.
थाई स्ट्रेच
पाय फोल्ड करून गुडघ्यांवर बसा आणि डोक्यापासून पायांपर्यंत शरीर सरळ ठेवा. नंतर तुमचे दोन्ही हात खांद्याच्या समोर सरळ करा. दोन्ही हात खाली करा आणि शरीराचा वरील भाग मागच्या बाजूने ४५ डिग्रीपर्यंत वाकवण्याचा प्रयत्न करा. ही एक्सरसाइज ५ वेळा करा.
बल लेग स्ट्रेच
जमिनीवर चटई टाकून सरळ झोपा आणि मान जमिनीपासून थोडी वर उचला. नंतर दोन्ही हात मागच्या बाजूने घ्या. आता पाय गुडघ्यापासून वाकवून छातीजवळ घ्या आणि दोन्ही हातांनी पाय पकडा. नंतर आधीच्या स्थितीत परत या. ही एक्सरसाइज ५ वेळा करा.
काय होतात फायदे?
1) नियमितपणे पायलेट्स एक्सरसाइज केल्याने तुम्हाला काही आठवड्यात स्तनांच्या आकारात परिवर्तन बघायला मिळेल.
२) पायलेट्समध्ये ब्रिदींग एक्सरसाइजचाही समावेश असतो. ज्याने फुप्फुसं आणि रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.
३) पायलेट्समुळे शरीराची एनर्जी लेव्हल वाढते, तसेच मेंदू आणि मसल्समध्ये ताळमेळ बसवण्यासाठीही पिलाटे एक्सरसाइज करायला हवी.
४) जर तुम्हालाही मांसपेशी आकर्षक आणि मजबूत करायच्या असतील तर पायलेट्स एक्सरसाइज चांगला पर्याय आहे. ही एक्सरसाइज केल्याने तुमच्या मसल्स बारीक, लांब आणि आकर्षक दिसतील.
५) जर तुम्हाला समोर आलेलं पोट कमी करायचं असेल तर ही एक्सरसाइज चांगला पर्याय आहे. ही एक्सरसाइज कमी करून काही आठवड्यात तुम्ही पोट कमी करू शकता.
६) रोज ४५ मिनिटांची एक्सरसाइज करून तुमचा मेंदूही फिट राहील. त्यासोबतच नियमितपणे ही एक्सरसाइज केल्याने तणाव, टेन्शन आणि स्ट्रेसची समस्याही दूर होते.