शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सावधान! जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा हीच चूक करत असाल; तर कितीही पौष्टीक खा, होणार नाही फायदा 

By manali.bagul | Updated: February 5, 2021 12:00 IST

Health Tips in Marathi : तुम्हीसुद्धा जेवणानंतर लगेचच पाणी पीत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं.  जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये हे अनेकांना माहीत असतं.

निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आजही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी  गंभीर आजारांचे कारण ठरतात. नेहमी फीट आणि निरोगी राहण्यासाठी जेवल्यानंतर लगेचच पाण्याचे सेवन करणं योग्य ठरत नाही. जर तुम्हीसुद्धा जेवणानंतर लगेचच पाणी पीत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं.  जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये हे अनेकांना माहीत असतं. पण प्यायल्यानं काही होत नाही असा गैरसमज ठेवल्यामुळे लोक वारंवार तिच चूक करतात.  लगेच पाणी प्यायल्यानं शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

पचनतंत्र व्यवस्थित काम करत नाही

जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यानं खाल्लेल्या अन्नाचं पचन लगेच होत नाही.  अन्न पचवण्यासाठी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अन्न खाल्ल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन केल्यास वजन वाढू शकते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, जेवणाच्या दोन तास आधी पाणी प्या. पाणी प्यायल्याने ही जठराग्नि समाप्त होते. ही जठराग्नि जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही, गळून जाते. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. आयुर्वेदानुसार सकाळी अधिक पाणी पिणे, जेवल्यानंतर त्वरीत पाणी न पिणे हा उत्तम मार्ग आहे. यामुळे आजारांपासून दूर  राहण्यास मदत होते. 

गॅस अॅसिडीटी

खाल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं गॅस, अॅसिडीटीची समस्या उद्भवू शकते. गॅस आणि एसिडीटीच्या समस्येपासून लांब राहण्यासाठी लगेचच पाणी पिऊ नका.

डायबिटीसच्या रूग्णांसाठी धोकादायक

जेवणानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना धोकादायक ठरू शकते. जेवणानंतर ताबडतोब पाणी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

अल्सर

जेवणानंतर लगेच पाण्याचे पाणी प्यायल्यानं अल्सर होण्याची शक्यता असते. खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे गॅस आणि आम्लतेची समस्या देखील उद्भवू शकते. आपण जे अन्न खातो ते बेंबीच्या डाव्या बाजूला असलेल्या जठारात जाऊन पचन क्रिया होते. जठराग्नि खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नि ही पचन क्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

पाणी पिण्याची योग्य वेळ

सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWaterपाणीfoodअन्न