शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाठ दुखतेय, लघवीतून रक्त पडतंय; मूत्रपिंडाचा कर्करोग तर नाही? वेळीच गांभीर्य लक्षात घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:18 IST

शहरी भागांमध्ये हा आजार मध्यम वयोगटातील लोकांमध्ये अधिक आढळतो

लोकमत न्युज नेटवर्क, मुंबई: स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव या जीवनशैलीतील सवयींमुळे मूत्रपिंडाचा कर्करोग झपाट्याने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्यतज्ज्ञांच्या मते, २०५० पर्यंत या आजाराचे प्रमाण आणि मृत्यूदर दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. वेळेवर लक्षणे ओळखून उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो, परंतु अनेक रुग्णांना निदान उशिरा होते. मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण वाढताहेत. गेल्या काही वर्षांत भारतात मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये हा आजार मध्यम वयोगटातील लोकांमध्ये अधिक आढळतो. 

प्रमुख कारणे कोणती?

अधिक वजन, उच्च रक्तदाब, दीर्घकाळ चालणारा मधुमेह, धूम्रपान, औषधांचा गैरवापर आणि प्रदूषित हवा, पाणी यामुळे धोका वाढतो. लघवीतून रक्त येऊ लागल्यास सावधान. लघवीत रक्त दिसणे हे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे सर्वांत ठळक लक्षण आहे. अनेकदा वेदना नसल्याने रुग्ण दुर्लक्ष करतात. 

मूत्रपिंडाचा कर्करोग म्हणजे काय?

मूत्रपिंडातील पेशी अनियंत्रितपणे वाढून गाठ तयार होते, ती पुढे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते, यालाच मूत्रपिंडाचा कर्करोग म्हटले जाते. 

इतर लक्षणे कोणती?

पाठ किंवा कंबरेत वेदना, भूक मंदावणे, वजन कमी होणे, अशक्तपणा आणि ताप अशी लक्षणे आढळू शकतात. 

देशात सर्व प्रकारचे कॅन्सर कर्करोग जे आहेत त्यात दोन ते पाच टक्के प्रमाण हे मूत्रपिंड कर्करोगाचे आहे आणि हे प्रमाण भारतात दरवर्षी दोन ते चार टक्के वाढत आहे. धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना या कर्करोगाचा धोका अधिक असतो. जीवनशैलीतील बदलांमुळे मूत्रपिंडाचा कर्करोग वाढतो आहे. लघवीतून रक्त येणे हे लक्षण दुर्लक्ष करू नका. जेवणात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवणे, नियमित व्यायाम, तळलेले पदार्थ खाणे टाळा.श्रीरंग बिच्चू,  अधिकारी आणि नेफ्रोलॉजी विभाग प्रमुख, बॉम्बे हॉस्पिटल

English
हिंदी सारांश
Web Title : Kidney cancer: Blood in urine, back pain? Take it seriously!

Web Summary : Kidney cancer is rising due to lifestyle factors. Blood in urine is a key symptom. Obesity, high blood pressure, and smoking increase risk. Early diagnosis is crucial for survival. Include greens and exercise daily.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स