Piles Home Remedies : जास्त काळ बद्धकोष्ठतेची समस्या राहिल्याने पुढे पाइल्स म्हणजेच मूळव्याधची समस्या होते. ही समस्या गंभीर झाल्यावर पार्श्वभागातून रक्त येतं आणि स्थिती गंभीर होते. आजकाल बरेच लोक पाइल्सचा कोंब काढून टाकण्यासाठी सर्जरी किंवा इंजेक्शनची मदत घतेता. मात्र, अनेकदा हा उपाय करूनही समस्या दूर होत नाही.
तुम्हीही पाइल्सच्या समस्येने हैराण असाल तर आणि तुमचं उठणं-बसणं अवघड झालं असेल तर एकदा घरगुती उपाय ट्राय करा. योग गुरु बाबा रामदेव यांचा दावा आहे की, अनेक वर्षांपासून वापरले जाणारे दोन उपाय करून ३ दिवसात ही समस्या दूर करू शकता. हे उपाय सांगणारा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
गायीचं दूध आणि लिंबू
बाबा रामदेव यांच्यानुसार, एक कप थंड दुधात एका लिंबाचा रस टाका. हे दूध लगेच प्यावे. कारण जास्त वेळ ठेवाल तर दूध फाटू शकतं. हा उपाय तीन दिवस रिकाम्या पोटी करायचा आहे. गायीचं गरम करून थंड केलेल्या दुधाचाच वापर करावा.
केळ आणि कापूर
पाइल्सच्या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला केळ आणि कापराची गरज लागेल. पिकलेल्या केळीचा एक चतुर्थांश तुकडा घ्या. त्याला चिरा मारून त्याला चण्याच्या आकाराचा कापूर टाकून गिळून घ्या. तीन दिवस केळ असंच खा. या उपायासाठी भिमसेनी कापराचाच वापर करावा.
काय काळजी घ्याल?
- दिवसभर भरपूर पाणी प्यावे
- खाज आणि वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करा
- गुदद्वार स्वच्छ आणि कोरडं ठेवा
- रोज एक्सरसाईज करा
- अल्कोहोल आणि कॅफीनचं सेवन कमी करा