शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Baba ramdev medicine coronil :खुशखबर! रामदेव बाबांनी शोधला कोरोनाचा रामबाण उपाय; फक्त ३ दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 11:43 IST

Yog guru baba ramdev launched coronas new medicine coronil : दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली. 

कोरोना व्हायरसचे (CoronaVirus) उपाय शोधण्यासाठी संपूर्ण जगभरातील तज्ज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरस पुन्हा स्ट्रेन बदलत असल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरात असलेली औषधं निष्क्रीय ठरतील का अशी भीती सगळ्यांमध्येच आहे.  दरम्यान कोरोनाच्या उपचारांबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. योगगुरू बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी कोरोनावर रामबाण उपाय (Medicine for Coronavirus) शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले आहेत.  आज दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली. 

रामदेव बाबा  यांनी अशी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर (COVID-19) उपचार होतील. त्यांनी असा दावा केला आहे की आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे. यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.

याआधीही रामदेव बाबांनी कोरोनाचे उपचा शोधण्याचा दावा केला होता. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते म्हणून बुस्टर असं या औषधाला म्हटलं होतं आता रामदेव बाबांनी कोरोनिलला  CoPP - WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे. पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की 70 टक्के रुग्ण तीन दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील.

''आजचा ऐतिहासिक असून  छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती आहे. एव्हिडन्स मेडिसीन्स म्हणून एव्हिडन्स आधारित संशोधन आहे. की वैद्यकीय क्षेत्रात भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल,'' असं रामदेव बाबा यावेळी म्हणाले. 

मी कोरोनाची लस घेणार नाही; आमचा योगावतार जिंदाबाद आहे

 मी कोरोनाची लस घेणार नाही. मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं होतं. एका वृत्तवाहिनीवर बोलताना बाबा रामदेव म्हणाले होते की, "कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये, असं बाबा रामदेव यांनी सांगितले. 

मी वृत्तवाहिनीवर खुलेआम जाहीर करतो की, '' मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला कोरोना देखील होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. कोरोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे,'' असं बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच कोरोनाशी घाबरुन राहण्याची गरज नाही. ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत आणि ते योगही करतात. याशिवाय ज्यांना गरज आहे त्यांनी कोरोनाची लस जरुर घ्यावी. मी याच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही, असं बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpatanjaliपतंजलीBaba Ramdevरामदेव बाबाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याmedicineऔषधं