शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्मान वय वंदना कार्ड कसे बनवायचे? 22 हजारांहून अधिक लोकांना लाभ, 40 कोटी रुपये खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 19:36 IST

Ayushman Vay Vandana Card : आयुष्मान वय वंदना कार्ड लाँच झाल्यापासून लोकांच्या उपचारांवर 40 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

Ayushman Vay Vandana Card : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कव्हर करण्यासाठी विस्तारित करण्याची घोषणा केली होती. या विस्तारांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 'आयुष्मान वय वंदना कार्ड' देण्यात येत आहे. योजनेद्वारे नागरिक आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत.

आयुष्मान वय वंदना कार्ड लाँच झाल्यापासून लोकांच्या उपचारांवर 40 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 22,000 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

अनेक आजारांवर उपचार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 29 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या आयुष्मान वय वंदना कार्डसाठी 25 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनरी अँजिओप्लास्टी, हिप फ्रॅक्चर/रिप्लेसमेंट, पित्ताशय काढणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 'प्रोस्टेट रेसेक्शन', स्ट्रोक, हेमोडायलिसिस, विषमज्वर आणि इतर तापजन्य आजारांसारख्या विविध परिस्थितींवर उपचार केले आहेत, असे मंत्रालयाने सांगितले. 

पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षणआयुष्मान वय वंदना कार्ड हे सामाजिक-आर्थिक स्थिती न पाहता 70  वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते. हे कार्ड सुमारे 2000 वैद्यकीय प्रक्रियांचे उपचार देते आणि कोणत्याही प्रतीक्षा कालावधीशिवाय पहिल्या दिवसापासून सर्व विद्यमान आजारांना कव्हर करते.  आयुष्मान वय वंदना कार्डसाठी नावनोंदणी करण्यासाठी, पात्र लाभार्थी आयुष्मान ॲप डाउनलोड करू शकतात किंवा जवळच्या संलग्न हॉस्पिटलला भेट देऊ शकतात.

आयुष्मान वय वंदना कार्ड बनवण्याची प्रक्रियाआयुष्मान वय वंदना कार्डसाठी, अधिकृत वेबसाइट https://nha.gov.in/PM-JAY ला भेट द्या. तेथे तुम्हाला PMJAY For 70+ चा पर्याय दिसेल. या पर्यायातील एनरोलवर क्लिक करा. जर एखादी व्यक्ती स्वतःसाठी अर्ज करत असेल तर, बेनेफिशियरी पर्याय निवडा आणि सर्व आवश्यक माहिती भरून लॉग इन करा. कुटुंबातील एखादा सदस्य वृद्धांसाठी अर्ज करत असल्यास ऑपरेटर पर्याय निवडा. अर्जासाठी आधार कार्ड, फॅमिली आयडी यासारखी कागदपत्रे आवश्यक असतील. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आयुष्मान कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सayushman bharatआयुष्मान भारत