शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

आयुर्वेदात सांगितलं आहे केळी खाण्याची योग्य वेळ, अनेक समस्या लगेच होतील दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 15:19 IST

Banana Eating Benefits : केळी योग्य पद्धतीने खाल्ले तर शरीराला अधिक फायदे मिळतात. प्रत्येक गोष्ट खाण्याची एक योग्य वेळ असते. ती केळी खातानाही पाळली गेली पाहिजे.

Banana Eating Benefits : केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. केळीचं सेवन केल्याने पोट भरलं राहतं. सोबतच आरोग्यालाही इतर अनेक फायदे मिळतात. पण केळी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर आरोग्याचं नुकसानही होतं. आयुर्वेदात केळी खाण्याची योग्य पद्धत सांगण्यात आली आहे. केळी योग्य पद्धतीने खाल्ले तर शरीराला अधिक फायदे मिळतात. प्रत्येक गोष्ट खाण्याची एक योग्य वेळ असते. ती केळी खातानाही पाळली गेली पाहिजे.

केळी खाण्याची योग्य वेळ

आयुर्वेद एक्सपर्ट्सनुसार, सामान्यपणे सगळी फळं जेवण करण्याआधी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण केळी हे एक असं एकुलतं एक फळ आहे जे जेवण केल्यावरही खाऊ शकता. जेवण केल्यावर केळी खाण्याचे अनेक फायदे असतात. याने अॅसिडिटीसारखी समस्या लगेच दूर होते.  केळी खाल्ल्याने पित्तही कमी होतं. तसेच रक्तही शुद्ध होतं. इतकंच नाही तर केळी खाल्ल्याने शरीरातील टॉक्सीन बाहेर निघतात. 

चरक संहितेमध्ये सांगण्यात आलं आहे की, केळी खाताना किंवा नंतर काही वेळासाठी काही चुका करू नये. याने शरीराला नुकसान पोहोचू शकतं. ही माहिती मलेशियाचे मेडिकल न्यूट्रिशनिस्ट विपिन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. चला जाणून घेऊ याबाबत...

1 तास पिऊ नका पाणी

आयुर्वेदात कोणतंही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यास मनाई केली आहे. हा नियम केळी खाण्यावर लागू पडतो. हे फळं पचनाला जड असतं आणि पाण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. केळी खाल्ल्यावर 1 तासाच्या अंतराने तुम्ही पाणी पिऊ शकता. 

केळी खाण्याचे फायदे

पोषक तत्वे

जर तुम्ही 115 ग्रॅम केळींच सेवन केलं तर त्यातून तुम्हाला इतके पोषक तत्वे मिळतात की, तुम्ही हैराण व्हाल. 

110 कॅलरी

30 ग्रॅम कार्बोहायड्रेट

1 ग्रॅम प्रोटीन

0.3 मिलीग्रॅम मॅग्नीज

450 मिलीग्रॅम पोटॅशियम

34 मिलीग्रॅम मॅग्नेशियम

0.3 मिलीग्रॅम आयर्न

0.1 मिलीग्रॅम रायबोफ्लेविन

0.8 मिलीग्रॅम नियासिन

81 इंटरनॅशनल यूनिट व्हिटॅमिन ए

0.5 मिलीग्रॅम व्हिटॅमिन बी-6

9 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी

3 ग्रॅम डाइट्री फायबर

25 मायक्रोग्रॅम फॉलेट

यासोबतच केळींची खासियत म्हणजे यात फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम अजिबात नसतं. तर पोटॅशिअमचं प्रमाण भरपूर असतं. एका व्यक्तीला एका दिवसात ४७०० मिलीग्रॅम पोटॅशिअमची गरज असते. 

केळी खाल्याने हृदय रोग दूर राहतात

केळी हृदय रोगाने ग्रस्त लोकांसाठी फार फायदेशीर असतात. नियमीत रुपाने केळी खाल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. या कारणाने केळी खाल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. तसेच यात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्या कारणाने रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. दररोज दोन केळी खाणाऱ्यांना हृदय रोग आणि पचनक्रियेसंबंधी समस्या होत नाही.

केळी खाल्याने डोकं शांत राहतं

तणाव किंवा डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्याने तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते. कारण केळींमध्ये प्रोटीन आणि अनेक अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे डोकं शांत करतात. 

ब्लड प्रेशर राहतं कंट्रोल

केळीचं सेवन नियमीतपणे केल्याने ब्लड प्रेशर सामान्य राहतं. यात पोटॅशिअम आढळतं जे ब्लड प्रेशरमुळे होणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका कमी करतात. तसेच याने हायपरटेंशनची समस्याही नियंत्रित राहते. 

लहान मुलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी फायदेशीर

लहान मुलांच्या विकासासाठी केळी फार फायदेशीर आहे. केळीमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन आढळतात ज्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो. त्यामुळे लहान मुलांना नियमीत केळी द्यायला हवीत. तसेच केळी वयोवृद्धांसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी, बी ६ आणि फायबर आढळतात जे वाढत्या वयात गरजेचे असतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य