अनेक लोकांना आजकाल कमजोरी आणि सतत थकवा जाणवतो. याचं कारण शरीरात कॅल्शिअमची कमतरता असू शकतं. सतत अंगदुखी, हलकं काम करतानाही थकवा, डोळ्यांमध्ये जडपणा, सांधेदुखी, डोकं जड वाटणे, मांसपेशींमध्ये वेदना या समस्या होण्याचंही कारण कॅल्शिअमची कमतरता असू शकतं.
कॅल्शिअम एक आवश्यक पोषक तत्व आहे जे हाडं आणि दातांना मजबूती देतं. अशात कॅल्शिअमची कमतरता झाली तर हाडं आणि दातही कमजोर होतात. अशात ही कमतरता भरून काढण्यासाठी योग्य उपाय करणं गरजेचं असतं. आयुर्वेद डॉक्टर इरफान खान यांनी कॅल्शिअमसाठी एक आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे.
कॅल्शियमसाठी आयुर्वेदिक उपाय
डॉक्टर जो आयुर्वेदिक उपाय तुम्हाला सांगत आहेत, तो तुम्ही घरीच सहजपणे करू शकता. यासाठी जी गोष्टी लागते ती सहजपणे घरात मिळू शकते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तिळाची गरज लागेल. यासाठी तुम्हाला २०० ग्रॅम तीळ घ्यावे लागतील.
कसं तयार कराल?
पांढरे तीळ एका तव्यावर चांगल्याप्रकारे भाजून घ्या. भाजल्यानंतर मिक्सरमधून त्याची पावडर तयार करा. या पावडरचा वापर करण्यासाठी एका डब्यात स्टोर करा.
कसं कराल सेवन?
डॉक्टरांनी सांगितलं की, थकवा आणि कमजोरी दूर करण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी एक चमचा तिळाचं पावडर एक ग्लास दुधात टाकून उकडा. हे दूध सकाळी आणि सायंकाळी प्यायल्याने हाडं मजबूत होतील आणि तुमचा थकवाही गायब होईल.
तिळाचे फायदे
डॉक्टरांनुसार, या उपायाने शरीराची कमजोरी दूर होईल, शरीराला ऊर्जा मिळेल. कितीही काम केलं तरी तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तसेच हाडांमध्ये कॅल्शिअमची कमतरताही भरून निघेल. हा उपाय लहान मुले आणि वृद्धांसाठीही फायदेशीर आहे.