शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं 'या' तीन भाज्यांचं नियमित करा सेवन, पोटातील विषारी पदार्थ येतील बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:24 IST

Body Detox Vegetable : शरीरात हवा आणि खाण्या-पिण्याच्या माध्यमातून अनेक विषारी पदार्थ जमा होतात. तशा तर आपल्या किडनी शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर काढतात. पण तरीही अनेक अपशिष्ट पदार्थ आतड्यांमध्ये चिकटून राहतात.

Body Detox Vegetable : शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. जास्तीत जास्त लोक शरीराची बाहेरील स्वच्छता करण्यावर अधिक भर देतात. आपला चेहरा कसा दिसतो, आपले केस कसे दिसतात, त्वचा कशी आहे याबाबत सगळेच काळजी करत असतात. पण जास्तीत जास्त लोक शरीराची आतून स्वच्छता करण्याकडे फार दुर्लक्ष करतात. शरीराची आतून स्वच्छता केली नाही तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरात हवा आणि खाण्या-पिण्याच्या माध्यमातून अनेक विषारी पदार्थ जमा होतात. तशा तर आपल्या किडनी शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर काढतात. पण तरीही अनेक अपशिष्ट पदार्थ आतड्यांमध्ये चिकटून राहतात.

आतड्यांमध्ये जमा झालेले हा विषारी पदार्थ बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. तुम्ही हे नेहमीच ऐकलं असेल की, अनेक आजारांचं मूळ हे पोटात असतं. म्हणजे पोटापासूनच अनेक आजार सुरू होतात. पोट साफ नसल्याने अनेक गंभीर आजार होतात. यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, भूक कमी लागणे, पाइल्स, अॅसिडिटी, वजन कमी होणे, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार अशा समस्या होतात. 

आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी आणि त्यातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी अनेक भाज्यांची मदत मिळते. अशात आयुर्वेदिक डॉक्टर चैताली राठोड यांनी सांगितलं की, पोटातील आतड्यांमध्ये जमा असलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तीन भाज्या फार महत्वाच्या ठरतात. चला जाणून घेऊ त्या भाज्यांबाबत...

पांढरा भोपळा

पांढरा भोपळा ही फार पौष्टिक आणि चविष्ट भाजी असते. ही भोपळ्याच्या प्रजातींमधील एक प्रजाती आहे. हिवाळ्यात ही भाजी भरपूर मिळते. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

पांढरा भोपळा सेवन करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी याचा ज्यूस प्यावा. याने आतड्या आणि मूत्राशय साफ होतं. तसेच शरीराची ऊर्जा वाढते. वात आणि पित्त दोषही यामुळे कमी होतो.

शेवग्याच्या शेंगा

आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना शिग्रु म्हणतात. यात कॅल्शिअम, आयरन, मॅग्नेशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि इतरही आरोग्यासाठी फायदेशीर तत्व असतात. याच्या सेवनाने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

डॉक्टरांनी सांगितलं की, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा सूप, ज्यूस किंवा भाजी खाऊ शकता. याने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतील.

आतड्यांची स्वच्छता करेल आलं

कफ आणि वात दोष दूर करण्यासाठी आलं सगळ्यात चांगलं मानलं जातं. तसेच याने बद्धकोष्ठताही दूर होते. जुनी श्वास घेण्याची समस्या, अस्थमा, लठ्ठपणा, आतड्यांची स्वच्छता यात हे फार फायदेशीर असतं.

पोट आणि आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही सगळ्या भाज्यांमध्ये एक आल्याचा तुकडा बारीक करून टाकू शकता. डॉक्टरांनी सांगितलं की, हे केल्यावर तुम्हाला 10 दिवसात फरक दिसून येईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य