- अर्जुन विर्दी(फिटनेस कोच)
तुम्ही रोज व्यायाम करता का ?, एका मिनिटामध्ये तुम्ही किती बैठका मारता ?, तुमच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण योग्य आहे का ?, तुम्ही जिमला जाता का ?, तुम्ही १० किलोमीटर धावता का ?, तुम्ही काही विशिष्ट डाएट करता का ?, तुम्ही कमाल किती किलो वजन उचलू शकता ?, दिवसाकाठी तुम्ही किती लीटर पाणी पिता?, तुम्ही पुरेशी झोप घेता का ?
वर उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रत्येकाची विशिष्ट उत्तरे असतील. पण तुम्ही खरंच फिट आहात का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे वर नमूद केलेल्या प्रश्नांची चांगली उत्तरे तुमच्याकडे असली तरीदेखील दिवसाच्या २४ तासांपैकी तुम्ही केवळ चार टक्के वेळच व्यायामाला देत असता. त्यावरून तुमचा फिटनेस ठरत नाही. त्याऐवजी व्यायामानंतर दिवसाचा उर्वरित ९६ टक्के वेळ तुम्ही कसा घालवता, यावरून तुमचा शारीरिक आणि मानसिक फिटनेस ठरतो.या संदर्भात काही मुद्दे आहेत. त्याचा प्रत्येकाने विचार करावा.लहानमोठ्या कामांसाठी तुम्ही वाहनाचा वापर करता का ?तुम्ही दिवसातील बहुतांशकाळ लोळता का ? तुम्ही स्वतः स्वयंपाक करता का ? तुम्ही कितीवेळा ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ मागवता ?तुम्ही पुरेसे झोपता का ?मुलांसोबत तुम्ही बाहेर खेळता का ?तुम्हाला मुलांसोबत वेळ घालविणे कठीण वाटते का ? त्याऐवजी तुम्ही मुलांच्या हातात मोबाईल देता ?आयुष्याबद्दल आनंदी आहात का ?ज्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी तुम्ही करता का ?तुम्ही आनंद घेत खाता की कॅलरी, वजन वाढेल असा विचार करत खाता ?तहान लागल्यावर पाणी पिता की दिवसाचा कोटा पूर्ण करण्यासाठी पिता ?महिन्याचे किराणा सामान तुम्ही उचलून आणता का ?सूर्य डोक्यावर येईपर्यंत तुम्ही झोपता की सूर्योदयापूर्वीच तुम्ही उठता ?