शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

अनुष्का शर्माचं फिटनेस अन् ब्युटी सिक्रेट अनलॉक, खुद्द अनुष्कानेच शेअर केला नाश्त्याचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 13:55 IST

अनुष्का सडपातळ कंबर आणि उत्तम फिटनेससाठी नेमकं काय करते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यामागचे रहस्य खुद्द अनुष्कानेच उघड केलं आहे आणि ते रहस्य म्हणजे तिचा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ब्रेकफास्ट.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झाल्यानंतरही तितकीच फीट आणि ब्युटीफुल आहे. मग तिच्या फिटनेसची चर्चा होणारच. अनुष्का शर्माने काही दिवसांतच फॉर्ममध्ये येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. अनुष्का सडपातळ कंबर आणि उत्तम फिटनेससाठी नेमकं काय करते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यामागचे रहस्य खुद्द अनुष्कानेच उघड केलं आहे आणि ते म्हणजे तिचा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ब्रेकफास्ट.

या गोष्टी नाश्त्यात खाल्ल्या जातातअलीकडेच अनुष्का शर्माने (Anushka Sharma) इंस्टाग्रामवर तिच्या ब्रेकफास्टचा फोटोच शेअर केला आहे. हा ब्रेकफास्ट एका काचेच्या बरणीत आहे. हा पदार्थ दिसायला जितका चविष्ट वाटत आहे, तितकाच खायलाही आरोग्यदायी आहे. या बरणीमध्ये फळे, अक्रोड, दूध आणि चिया बियांनी बनवलेली आरोग्यदायी स्मूदी आहे. हा नाश्ता बनवायला सोपा आणि झटपट तयार करता येतो . यामध्ये असलेल्या उच्च प्रथिनांमुळे तुम्हाला लवकर भूकही लागत नाही आणि तुमचे वजनही कंट्रोलमध्ये राहते. यासोबतच शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.

हा नाश्ता बनवणे खूप सोपे आहेरोल केलेले ओट्स एका मेसन जारमध्ये २/३ इतक्या उंचीपर्यंत भरा आणि नंतर त्यात २ चमचे चिया बिया घाला. आता दूध घाला आणि २ चमचे मध आणि तुमच्या आवडीचा सुका मेवा मिक्स करा. त्यात ताजी फळे टाका आणि मिक्स करून खा. जर तुम्हाला मध खाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही त्यात एक चमचा व्हॅनिला अर्क देखील टाकू शकता. हा भरपूर फायबरचा नाश्ता केल्यानंतर, तुम्हाला अनेक तास दुसरे काहीही खाण्याची गरज भासणार नाही आणि तुम्ही अनहेल्दी पदार्थांपासून दूर राहाल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सAnushka Sharmaअनुष्का शर्मा