एनर्जी का दुसरा नाम शंकरजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:28 IST2016-03-11T11:28:48+5:302016-03-11T04:28:48+5:30
कटयार काळजात घुसली या चित्रपटाच्या माध्यमातून शंकरजी यांच्यासोबत तीन वर्ष काम केले आहे.

एनर्जी का दुसरा नाम शंकरजी
क यार काळजात घुसली या चित्रपटासहित यातील कलाकारांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले आहे. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर प्रचंड यश मिळवले आहे. पण या चित्रपटाच्या आठवणी, संगीतकार शंकर महादेवन यांच्यापासून मिळालेले अनुभव, प्रेरणा अजून ही अभिनेता सुबोध भावे याच्या मनात घर करून बसल्या आहेत. अशाच काही आठवणी सुबोधने लोकमत सीएनएक्सशी शेअर केल्या आहेत. सुबोध म्हणाला, कटयार काळजात घुसली या चित्रपटाच्या माध्यमातून शंकरजी यांच्यासोबत तीन वर्ष काम केले आहे. खूप शांत व उत्साही आहेत.त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.त्यांच्याजवळ कोणताही प्रॉब्लेम घेउन जावा तो प्रॉब्लेम सॉल तर होतोच. उलट दहा गोष्टी जास्त चांगल्या सुचतात.त्यांच्यासोबत काम करत राहिलो तर वेळ देखील कधी संपते याचे भान देखील राहत नाही. संगीतकार, गायक शंकर महादेवन यांच्यासोबत काम करताना इतकी एॅनर्जी मिळते की, एनर्जी का दुसरा नामच शंकरजी आहे असे वाटते.