शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे 'या' गंभीर आजाराचे प्रमाण वाढले, किशोरवयीन मुलांना जास्त धोका; संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 14:04 IST

ढांमध्‍ये महामारीच्‍या काळात लठ्ठपणा वाढला आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही, परंतु लठ्ठपणाच्‍या भीतीमुळे कमी खाल्ल्याने एनोरेक्सियाच्‍या (Anorexia) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

कोविड-19 महामारीच्या काळात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर जगभरातील अनेक लोक आपापल्या घरात अक्षरश: कैद झाले होते. यामुळे लोक घरात राहून जास्त अन्न खातील, ज्यामुळे लठ्ठपणा वाढेल, अशी भीती होती. प्रौढांमध्‍ये महामारीच्‍या काळात लठ्ठपणा वाढला आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही, परंतु लठ्ठपणाच्‍या भीतीमुळे कमी खाल्ल्याने एनोरेक्सियाच्‍या (Anorexia) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

कॅनडाच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या (McGill University) संशोधनातून असे दिसून आले आहे की, महामारीच्या काळात एनोरेक्सियाने ग्रस्त किशोरवयीनांच्या संख्येत ६५ टक्के वाढ झाली आहे. एनोरेक्सिया हा एक आजार आहे ज्यामध्ये पौगंडावस्थेतील वजनात अन्नाच्या कमतरतेमुळे लक्षणीय घट होते. किशोरवयीन मुलांच्या मनात जास्त खाल्ल्याने आपण लठ्ठ होऊ, अशी भीती लागून राहते. त्यामुळे असे लोक काहीही खाताना टाळाटाळ करतात. विशेष म्हणजे खूप खाल्ले आहे, असे वाटले तरी अशा लोकांच्या (Anorexia in teens) उलट्या होतात.

रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढलीडेलीमेलच्या वृत्तानुसार, संशोधकांना रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे असे आढळून आले की, महामारीपूर्वी १३ ते १६ वर्षे वयोगटातील २४.५ टक्के किशोरांना दर महिन्याला एनोरेक्सियाच्या उपचारासाठी यावे लागत होते, तर साथीच्या आजारानंतर ४०.६ टक्के किशोरवयीन मुले उपचारासाठी येत आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही संख्या ६५ टक्क्यांवर गेली आहे. एनोरेक्सिया असलेल्या किशोरवयीन मुलांचा हॉस्पिटलायझेशन दर देखील १६६ टक्क्यांनी वाढला आहे. यावरून असा अंदाज लावता येतो की, किशोरवयीन मुले लठ्ठपणाबाबत कोणत्या ना कोणत्या इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्सने त्रस्त असतात.

चिंता आणि नैराश्येचे बळीअभ्यासात असे आढळून आले की, ज्या किशोरवयीन मुलांना एनोरेक्सियासाठी उपचार घ्यावे लागतात, त्यांच्या शरीराचा आकार (बॉडी शेप) खराब होतो. संशोधकांनी २०१५ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान एनोरेक्सियावर उपचारासाठी आलेल्या किशोरवयीन मुलांचा डेटा गोळा केला.

यानंतर, विश्लेषणात असे दिसून आले की १३ ते १६ वयोगटातील किशोरवयीन मुले लठ्ठपणाबद्दल खूप चिंतेत आहेत. या भीतीमुळे बहुतांश किशोरवयीन मुलांनी खाण्यापिण्यावर मर्यादा आणल्या आहेत. संशोधकांनी सांगितले की, एनोरेक्सियाने ग्रस्त असलेल्या किशोरांना इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. अशी किशोरवयीन मुले खूप लवकर चिंता आणि नैराश्येचे बळी ठरतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स