'हा' दुर्मिळ प्राणी खाल्ल्यामुळे पसरला कोरोना व्हायरस!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 02:55 PM2020-02-12T14:55:41+5:302020-02-12T14:57:59+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरसने सगळ्यात देशात भितीचे वातावरण निर्माण केले आहे.

animal pangolin may have spread corona virus to humans | 'हा' दुर्मिळ प्राणी खाल्ल्यामुळे पसरला कोरोना व्हायरस!

'हा' दुर्मिळ प्राणी खाल्ल्यामुळे पसरला कोरोना व्हायरस!

googlenewsNext

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरसने सगळ्यात देशात भितीचे वातावरण निर्माण केले आहे.  अनेक गैरसमज या आजाराबदद्ल लोकांमध्ये आहेत. चीनमधून पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या आजाराची लागण होऊ नये. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे उपाय हे जगभरात केले जात आहेत. 

हा आजार कोणत्या प्राण्यामुळे होतो. याबाबत अनेक गैरसमज आहे. सापापासून तर कधी कोंबड्यांपासून कोरोना व्हायरस पसरत असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या. अलिकडच्या काळात वटवाघळामुळे हा आजार पसत असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं होत. पण या अफवांबाबत एक महत्वपूर्ण खूलासा चीनकडून करण्यात आला आहे.

संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार मनुष्य प्रजातीमध्ये कोरोना व्हायरस पँगोलिन Pengolin या प्राण्यापासून पोहोचला आहे. या प्राण्यामुळे कोरोना व्हायरस पसरत असल्याचा दावा केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पँगोलिन या प्राणाची प्रजात अतिशय दुर्मिळ आहे. हा स्तनधारी वन्यजीव इतर स्तनधारी वन्यजीवांपेक्षा फार वेगळा दिसतो. या प्राण्याचा आकार सुद्धा वेगळा  आहे. त्याचा आकारही काहीसा वेगळाच असतो. खजुराच्या झाडावर असणाऱ्या खवलांप्रमाणे या प्राण्याचं शरीरही खवलांच्या एका टणक आवरणाने अच्छादलेलं असतं. दूरून पाहिल्यास हा एखाद्या लहान डायनासॉरप्रमाणे दिसतो.

पँगोलिन हा प्राणी लहान जीव म्हणजेच किटक, मुंग्या आणि लहान किडे खातो. चीनकडून लावण्यात आलेल्या शोधानुसार कोणा एका व्यक्तीने हा प्राणी खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण मनुष्य प्रजातीमध्ये झाल्याची शक्यता आहे. ( हे पण वाचा-डाळी नेहमीच खात असाल पण त्यांचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतील, वाचून व्हाल अवाक्)

या माहितीमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की हा आजार वटवाघळांमुळे झालेला नाही हे स्पष्ट झाले आहे. पण पँगोलिन या प्राण्यापासून  कोरोना व्हायरस पसरत आहे. या वक्तव्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईजेशनने अद्याप मान्य केलेले नाही.  जर या शोधाला मान्यता मिळाली तर लवकरात लवकर उपाय शोधला जाऊ शकतो. ( हे पण वाचा-हाय बीपीला घाबरताय? मग 'हे' वाचाच, गैरसमज होतील दूर...)

Web Title: animal pangolin may have spread corona virus to humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.