Heartburn problems after meal : जेवण केल्यानंतर अनेकदा अनेकांना छातीत जळजळ होते. ज्याला हार्टबर्न किंवा अॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. छातीत जळजळ होत असल्यानं अस्वस्थ जाणवतं आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. मुळात छातीत जळजळ तेव्हा होते, तेव्हा पोटात अॅसिड अन्ननलिकेत परत जातं. जास्तकरून मसालेदार, तळलेले-भाजलेले किंवा जास्त आंबट पदार्थ खाल्ल्यास ही समस्या होते. त्याशिवाय जास्त खाणं किंवा घाईघाईनं खाल्ल्यास सुद्धा ही समस्या होते. अशात ही समस्या दूर करण्याचे काही सोपे घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) पाणी प्या
जेवण केल्यावर लगेच पाणी पिणं एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पाण्यानं पोटातील अॅसिड पातळ करण्यास मदत मिळते, ज्यामुळे छातीत जळजळ कमी होते. त्याशिवाय यानं तुमचं पचन तंत्रही मजबूत करण्यास मदत मिळते. पाणी कमी असल्यानं सुद्धा ही समस्या होऊ शकते, त्यामुळे शरीरात पाणी कमी होऊ देऊ नका.
२) आले खा
आल्यामध्ये नॅचरल अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे पोटातील अॅसिड संतुलित करण्यास मदत करतात. जेवण केल्यानंतर आल्याचा एक छोटा तुकडा चावून खाऊ शकता किंवा आल्याचा चहा बनवू शकता. यानं जळजळ तर कमी होईलच, सोबतच पचनासही मदत मिळेल. नियमितपणे आल्याचं सेवन केलं तर पचन तंत्र मजबूत राहतं.
३) बडीशेप खा
बडीशेप खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली होते आणि अॅसिडचं उत्पादन नियंत्रित होतं. जेवण केल्यावर बडीशेप चावून खाल्ल्यास छातीतील जळजळ लगेच कमी होते. यानं पोट शांत होतं आणि जळजळ दूर होते. रोज जेवण झाल्यावर नियमितपणे बडीशेप खाल तर ही समस्या होणार नाही.
४) बेकिंग सोडा व पाणी
बेकिंग सोडा अॅसिडला न्यूट्रल करतो आणि पोटातील जळजळ कमी करतो. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून प्यायल्यास जळजळ कमी होईल. फक्त हा उपाय नेहमी नेहमी करू नका. कारण यानं पोटातील अॅसिड अधिक कमी होतं.
५) अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात टाकून प्यायल्यास जळजळ दूर होते. यानं पोटातील अॅसिडचं प्रमाण नियंत्रित होतं आणि पचनास मदत मिळते. एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर टाकून प्यायल्यास पोटातील अॅसिड रिफ्लक्सची समस्या दूर होते.