शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शेवग्याच्या शेंगांची भाजीच नाही तर सूप पिऊनही मिळतात खूपसारे फायदे, जाणून घ्या कोणते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:54 IST

Drumstick Soup benefits : शेवग्याच्या शेंगांचं सूप कधी प्यायलात का? जर तुम्ही कधी प्यायले नसाल आणि त्याचे फायदे माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.

Drumstick Soup benefits :  शेवग्याच्या शेंगाना, पानांना, फुलांना आयुर्वेदात खूप महत्व आहे. कारण यांची भाजी खाऊन शरीराला अनेक फायदे मिळतात. शेवग्याच्या शेंगा किंवा पानांची भाजी खाऊ तुम्हाला खूप प्रोटीन मिळतं. तसेच इतरही अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. शेवग्याच्या शेंगाची, पानांची किंवा फुलांची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, पण शेवग्याच्या शेंगांचं सूप कधी प्यायलात का? जर तुम्ही कधी प्यायले नसाल आणि त्याचे फायदे माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगाचं सूप पिऊन तुम्ही खूप फायदे मिळवू शकता. हेच फायदे आज जाणून घेऊ.

शेवग्याच्या शेंगांचं सूप पिण्याचे फायदे

- शेवग्याच्या शेंगा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि आतड्या साफ करण्यासाठी ओळखल्या जातात. याने लिव्हर, किडन्या आतून स्वच्छ होतील. त्यासाठी शेवग्याच्या शेंगांच सूप तुम्ही नेहमी प्यायला हवं.

- शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्यामुळे शरीराचा इन्फेक्शनपासून आणि वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. तसेच याच्या सेवनाने शरीरात पांढऱ्या रक्तपेशीही वाढतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा समस्याही होत नाहीत.

- नियमित शेवग्याच्या शेंगाचं सूप प्यायल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. शरीरात पोषक तत्व कमी झाल्यावर या सूपने ती कमी भरून निघते. यातील बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी मुळे इम्यूनिटी बूस्ट होते. ज्यामुळे तुम्ही नेहमी आजारी पडणार नाही.

- यात अॅंटी-इन्फ्लेमटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते. तसेच याने सांधेदुखी आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्याही दूर करण्यास मदत मिळते. यातील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात.

- शेवग्याच्या शेंगांमुळे पचनक्रिया चांगली होते. ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते. रिकाम्या पोटी शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायल्याने पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. 

- शेवग्याच्या शेंगांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. ज्यामुळे तुम्हाला हृदय रोगांचा धोका कमी होतो. 

कसं बनवाल शेवग्याच्या शेंगांचं सूप?

डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं याचा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य