शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच अनेक फायदे देतं हे फळ, रोज सेवन करून मिळवा आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:42 IST

सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. चला जाणून घेऊ खजूराचे गुण आणि त्याचे फायदे...

Date Fruit Benefits In Cholestrol : एक्सपर्ट नुसार, खजूरामध्ये अनेक औषधी गुण आढळतात. त्यामुळे खजूर नियमित खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यात मिनरल्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि फायबर असे गुण असतात. खजूर खाल्ल्याने अनेक समस्यांपासून सुटका मिळते. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. चला जाणून घेऊ खजूराचे गुण आणि त्याचे फायदे...

न्यूट्रिएंट्स भरपूर असतात

खजूरात भरपूर सारे न्यूट्रिएंट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खजूरात आयर्न, फायबर आणि हीमोग्लोबिनसारखे पोषक तत्व भरपूर असतात. यात कॅल्शिअम, फॉस्फोरस, आयर्न, पोटॅशिअम, कॉपर आणि मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स आढळतात. या तत्वांमुळे अनेक आजार दूर होतात.

मेंदुची शक्ती वाढते

खजूरात अ‍ॅंटी इंफ्लामेंटरी गुण असतात, जे मेंदूसाठी फायदेशीर असतात. खजूरातील हे गुण स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. याच्या सेवनाने अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी राहतो.

पाइल्स आणि पचन

तुम्हाला पाइल्सची समस्या असेल तर खजूर खाणं फायदेशीर ठरतं. खजूरात असलेल्या फायबरमुळे पाइल्सची समस्या दूर करण्यास मदत मिळते. हे खाल्ल्याने वेदना आणि ब्लीडिंगपासून सुटका मिळते. खजूरात असलेल्या फायबरमुळे पचनतंत्र मजबूत होतं. बद्धकोष्ठता आणि अपचन अशा समस्याही होतात दूर.

हृदय राहतं हेल्दी

खजूर हृदयासाठी फार फायदेशीर मानलं जातं. खजूर खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. खजूरातील तत्वांमुळे हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. थंडीच्या दिवसात हृदय हेल्दी ठेवण्यासाठी खजूराचं सेवन करा.

हाडे होतात मजबूत

खजूरामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, आयर्न, पोटॅशिअम, कॉपर आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्व खूप असतात. हे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात आणि मसल्सही चांगलं काम करतात. खजूर दुधात उकडून खावं. लहान मुलांना तर खजूर नियमित द्यावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य