शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे अ‍ॅल्युलोज...जाणून घ्या साखर आणि यात काय फरक आहे ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 19:37 IST

अ‍ॅल्युलोज एकाप्रकारची साखर असते जी फळांमध्ये असते. याच वैज्ञानिक नाव सुक्रोझ असे असते. यामध्ये कॅलरीज अगदीच कमी असतात. अ‍ॅल्युलोजमुळे वजन कमी राहते सोबत डायबेटीज, हार्ट प्रॉब्लेमवरही नियंत्रण राहते.

साखरेचं खाणार त्याला देव देणार ही  म्हण आपण ऐकली असेलच पण सध्या साखरेचं खाणार त्याच वजन वाढणार असंच चित्र आहे. पण तुम्हाला आम्ही एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत जी गोड तर आहेच पण त्याचबरोबर यात कॅलरी अजिबात नाही.

गोड म्हणजे अनेक खव्वयादर्दींचा विकपॉईंट. पण डायबेटीज, ब्लड प्रेशर, हार्टचा त्रास असणाऱ्या खव्वयांसाठी गोड खाणे दुरापास्तच. म्हणूनच की काय, साखरेचं सेवन करण्याची इच्छा याच प्रकारातल्या खव्व्ययांना जास्त होते.तुम्ही वजन कमी करत असाल तर साखर खाण्याचा प्रश्नच येतं नाही. कारण साखर म्हणजे कॅलरीज आणि कॅलरीजचं अतिप्रमाण म्हणजे लठ्ठपणा आणि पर्यायाने अनेक रोगांना आमंत्रण. 

आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकल्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही की असं काही घडू शकतं. अहो होच!तरं असं आहे की तुम्ही अगदी भरपूर गोड खाऊ शकता पण तुम्हाला काहीही त्रास होणार नाही.कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण हि किमया आहे अ‍ॅल्युलोज  या घटकाची. साखरेइतकाच गोड पण कॅलरीज साखरेपेक्षाही कमी. तुम्ही एल्यूलोज असलेले पदार्थ खाऊन गोड खाण्यावर ताबाही मिळवू शकता.

काय आहे अ‍ॅल्युलोज?अ‍ॅल्युलोज एकाप्रकारची साखर असते जी फळांमध्ये असते. याच वैज्ञानिक नाव सुक्रोझ असे असते. यामध्ये कॅलरीज अगदीच कमी असतात. अ‍ॅल्युलोजमुळे वजन कमी राहते सोबत डायबेटीज, हार्ट प्रॉब्लेमवरही नियंत्रण राहते.

आता अ‍ॅल्युलोजचे फायदे पाहु

वजन कमी करणेवजन कमी करणाऱ्यांनो तुम्हाला गोड खायची इच्छा होत असेल तर बिनधास्त अ‍ॅल्युलोजपासून बनवलेले पदार्थ खा. तुमचं वजन तर नियंत्रणात राहिलच पण वाढणारही नाही. यात कॅलरीज कमी असल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज नियंत्रणातच राहतील.

डायबेटीजच्या रुग्णांना फायदेशीर मधुमेहाच्या रुग्णांसाठी अ‍ॅल्युलोज भरपूर महत्वाचे आहे. यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते आणि तुम्हाला गोड खायचा आनंदही मिळतो. डायबेटीज असलेल्या रुग्णांना डॉक्टर कमी प्रमाणात गोड खाण्याचा सल्ला देतात. त्यावर अ‍ॅल्युलोजचे कमी प्रमाणातील सेवन लाभदायक ठरू शकते.

हार्ट प्रोब्लेमअ‍ॅल्युलोजमुळे आपले स्वास्थ्यही उत्तम राहते. हार्ट प्रोब्लेम असणाऱ्या रुग्णांनी अ‍ॅल्युलोजचे सेवन केल्यास त्यांचे हृदयाचे कार्य चांगले राहते. कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही.

((टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.))

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न