ALERT : आपणही चोरून ‘पॉर्न’ पाहता? तर एका भयंकर आजाराच्या कचाट्यात आहात आपण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 16:08 IST2017-02-02T11:35:21+5:302017-02-03T16:08:10+5:30
सेक्सच्या सवयीला ‘हायपरसेक्शुअल डिसआॅर्डर’चे नाव दिले आहे. ही समस्या १८ वर्षावरील कोणत्याही वयाच्या प्रौढांमध्ये दिसून येते. जर आपणातही असे काही लक्षणे जाणवत असतील तर समजा आपणासही सेक्सची सवय झाली आहे.

ALERT : आपणही चोरून ‘पॉर्न’ पाहता? तर एका भयंकर आजाराच्या कचाट्यात आहात आपण !
२०१० मध्ये अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने सेक्सच्या सवयीला ‘हायपरसेक्शुअल डिसआॅर्डर’चे नाव दिले आहे. ही समस्या १८ वर्षावरील कोणत्याही वयाच्या प्रौढांमध्ये दिसून येते. जर आपणातही असे काही लक्षणे जाणवत असतील तर समजा आपणासही सेक्सची सवय झाली आहे.
जर कोणी व्यक्ती दिवसभरात जास्त वेळ ‘सेक्स-फॅँटेसी’त व्यस्त असेल आणि असे वागणे सहा महिन्यापर्यंत सतत असेल तर हे एक सेक्स अॅडिक्शन आहे. जर आपण दिवसातील जास्त वेळ पॉर्न पाहण्यात व्यतीत करतात तर हेदेखील हायपरसेक्शुअल डिसआॅर्डरचे लक्षण असू शकते. विशेषत: ड्रग्स घेणाºया व्यक्ती या आजाराच्या कचाट्यात येतात. त्यांच्यासाठी सेक्स एखाद्या नशेपेक्षा कमी नसते. असे लोक स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तिसोबत सेक्स करण्यास तयार होतात.
जे लोक सायबर सेक्स आणि फोन सेक्ससाठीही उतावळे असतात, त्यांनीही जागृत व्हायला हवे. कारण तेही सेक्स अॅडिक्शनने पीडित होऊ शकतात. जर आपणास यापैकी कोणतेही लक्षण जाणवत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटावे. सायकोथेरेपी, गु्रपथेरेपी, मेडिकेशन आणि किमोथेरेपीद्वारे या आजारावर उपचार केला जाऊ शकतो.
Also Read : पोर्न पाहण्यात भारतीयांची सनी लिओनीला पसंती