मद्य सेवनाने वाढतो हृदयविकाराचा धोका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 11:25 IST2017-01-10T16:41:04+5:302017-01-12T11:25:26+5:30
बहुतांश लोकांना मद्य सेवनाची सवय जडली आहे. मात्र आपण जर रोजच मद्य सेवन करत असाल तर ही सवय आपल्यासाठी घातक ठरु शकते. मद्य सेवनाने केव्हाही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते...

मद्य सेवनाने वाढतो हृदयविकाराचा धोका !
ब ुतांश लोकांना मद्य सेवनाची सवय जडली आहे. मात्र आपण जर रोजच मद्य सेवन करत असाल तर ही सवय आपल्यासाठी घातक ठरु शकते. मद्य सेवनाने केव्हाही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, तसेच हृदयासंबंधित इतर आजार बळावण्याचीही शक्यता आहे, असे अमेरिकन संशोधकांनी सांगितले.
कमी प्रमाणातही अल्कोहोलच्या सेवनामुळे हृदयविकार होत नाही, असे अनेक संशोधकांनी म्हटले आहे. मात्र अमेरिकेच्या या संशोधकांनी हा मुद्दा खोडून काढला आहे. अल्कोहोलचे कमी किंवा अति प्रमाण हे आरोग्याला हानिकारकच असल्याचे म्हटले आहे.
यूसीएसएफचे जॉर्ज मारकस यांच्या म्हणण्यानुसार, अल्कोहोलचे मर्यादित सेवन हे हृदयविकाराविरोधात उपयुक्त असल्याचा दाखला वेगवेगळ्या संशोधनातून बऱ्याचदा देण्यात आला आहे, पण संशोधनातील काही निष्कर्षांतून अल्कोहोलच्या सेवनातून हा धोका अधिक बळावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
अल्कोहोलच्या सेवनामुळे उत्तेजित होणे किंवा छातीत धडधडल्यामुळे हा धोका अधिक बळावत असल्याचे लाखो रुग्णांच्या परीक्षणातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन हे मुळातच हृदय आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या यांच्यासाठी हितकारक नसून उलट तो विषारी घटक आहे. संशोधकांनी १४ कोटी ७२ लाख ७ हजार ५९१ लोकांच्या केलेल्या सर्वेक्षणातूनदेखील हेच सिद्ध होताना २६ लाख ८ हजार ८४ म्हणजे १.८ टक्के लोक हे अल्कोहोलच्या घातक परिणामांचे बळी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. हे सर्वेक्षण ‘अमेरिकन कॉलेज कार्डिओलॉजी’ (जेएसीसी) या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.