मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:59 IST2024-10-25T18:57:51+5:302024-10-25T18:59:01+5:30
लँसेट डिजिटल हेल्थमध्ये नुकसाच एक लेख प्रकाशित झाला आहे. यामध्ये एआय डेथ कॅलक्युलेटरबाबत माहिती देण्यात आली आहे.

मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
एखाद्याचा मृत्यू केव्हा होणार याची अमूक भविष्य सांगणाऱ्याने भविष्यवाणी केल्याचे अनेकदा तुम्ही किस्से ऐकले असतील. खरे ठरले तर त्याची या कानाची त्या कानाला चर्चा केली जाते. परंतू, आता तुमच्या ग्रह ताऱ्यांवरून नाही तर शरीराच्या आरोग्यावरून एखादी व्यक्ती अखेरचा श्वास कधई घेईल असे सांगणारा एआय आला आहे.
लँसेट डिजिटल हेल्थमध्ये नुकसाच एक लेख प्रकाशित झाला आहे. यामध्ये एआय डेथ कॅलक्युलेटरबाबत माहिती देण्यात आली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एखाद्या व्यक्तीचा मृत्यू केव्हा होणार हे सांगू शकणार आहे. हा देखील अंदाज असला तरी तुमच्या शरीराच्या परिस्थितीनुसार श्वास कधीपर्यंत घेणार म्हणजेच हृदय कधीपर्यंत चालणार याची वेळ यात कॅल्क्युलेट केली जात आहे.
युकेमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसशी संबंधीत दोन हॉस्पिटलमध्ये या कॅल्क्युलेटरची ट्रायल लवकरच घेतली जाणार आहे. या डेथ कॅल्क्युलेटरचे नाव AI-ECG Risk Estimator असे आहे. हा कॅल्क्युलेटर तुमचे हार्ट कधी फेल होईल याची भविष्यवाणी करणार आहे.
यासाठी ईसीजीची मदत घेतली जाणार आहे. सध्याच्या ईसीजी पद्धतीत अनेक मर्यादा आहेत. त्या दूर करण्यासाठी नवीन एआय टेक्निक विकसित करण्यात आली आहे. याची माहिती मिळताच युरोपमध्ये शेकडो लोकांना या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रायलमध्ये भाग मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. काही मिनिटांतच ईसीजीवरून हे निदान केले जाणार आहे. पुढील १० वर्षांत त्याचा मृत्यू होणार की नाही हे यातून सांगितले जाणार आहे. याची अचूकता ही ७८ टक्के आहे.
याचबरोबर भविष्यात होणाऱ्या आजाराबाबतही यात सांगितले जाणार आहे. सध्या दोन हॉस्पिटलमध्ये प्रायोगिक तत्वावर हे निदान सुरु होणार असले तरी ते संपूर्ण देशात सुरु होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो असे डॉक्टरांनी म्हटले आहे.