शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पपईसोबत चुकूनही खाऊ नका ही फळं, आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 12:07 IST

Health Tips : पपईमध्ये फॅट, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी, ए, ई, बी, खनिज, प्रोटीन आणि डायटरी फायबरसारखे अनेक पोषक तत्व आढळून येतात.

Health Tips : सामान्यपणे पपई आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असते. पपई खाल्ल्याने वजन कमी होतं, पचनक्रिया सुधारते आणि डायबिटीस कंट्रोल करण्यासही मदत मिळते. पपईमध्ये फॅट, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी, ए, ई, बी, खनिज, प्रोटीन आणि डायटरी फायबरसारखे अनेक पोषक तत्व आढळून येतात. केवळ इतकंच नाही तर यात अल्फा, बीटा, कॅरोटीन आणि ल्यूटिन नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंटही असतं.

पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स 60 असतो आणि यात डायटरी फायबर आढळतं, त्यामुळेच फिटनेस एक्सपर्ट रोज पपई खाण्याचा सल्ला देतात. पपईमध्ये आढळणारं पॅपीन एंजाइम अॅलर्जीसोबत लढतं आणि जखम भरण्यास मदत करतं. बरेच फायदे असूनही पपईचं सेवन करण्याचे काही नुकसानही आहेत.

फिटनेस गुरू होलिस्टिक एक्सपर्ट मिकी मेहता यांनी सांगितलं की, कोणते पदार्थ पपईसोबत खाल्ल्याने विषासारखा प्रभाव होऊ शकतो. हे पदार्थ पपईसोबत खाल्ले तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ कोणते आहेत ते पदार्थ...

लिंबासोबत पपई

पपई आणि लिंबाचं एकत्र सेवन चांगलं मानलं जातं नाही. जर तुम्ही सलादमध्ये पपई खात असाल तर त्यात लिंबाचा रस टाकू नका. याने ते विषारी होतं. लिंबू आणि पपई एकत्र खाल्ल्याने हीमोग्लोबिन लेव्हल असंतुलित होते आणि व्यक्ती एनीमियाचा शिकार होऊ शकते. त्यामुळे चुकूनही पपईसोबत लिंबूचं सेवन करू नका.

दह्यासोबत पपई

पपई उष्ण असते तर दही हे थंड असतं. त्यामुळे पपईनंतर लगेच दही खाणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही पपई खाल्ली असेल तर त्यानंतर दोन ते तीन तासांनंतरच दही खा. थंड आणि उष्ण हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. याने तुम्ही आजारी पडू शकता.

संत्रीसोबत पपई

लिंबूप्रमाणेच संत्रीही आंबट असतात. फ्रूट सलादमध्ये पपई आणि संत्री एकत्र करून कधीच खाऊ नये. याने पोटात विषारी पदार्थ तयार होतात. ज्यामुळे तब्येत बिघडू शकते. 

टोमॅटोसोबत पपई

पपई आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन चांगलं मानलं जात नाही. या दोन्हींचं एकत्र सेवन करणं विषार ठरू शकतं. त्यामुळे पपई आणि टोमॅटो कधीच एकत्र खाऊ नये.

कीवीसोबत पपई

कीवी एक आंबट फळ आहे. पपईसोबत कीवी खाल्ल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे हे दोन फळ एकत्र कधीच खाऊ नये.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य