स्वाइन फ्लूमुळे मंगळवारी ८ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:01+5:302015-03-25T21:10:01+5:30

गुजरातमधील एकाचा समावेश

8 people died due to swine flu on Tuesday | स्वाइन फ्लूमुळे मंगळवारी ८ जणांचा मृत्यू

स्वाइन फ्लूमुळे मंगळवारी ८ जणांचा मृत्यू

जरातमधील एकाचा समावेश
पुणे : राज्यात स्वाइन फ्लूमुळे मंगळवारी आणखी ८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये गुजरातमधील एका नागरिकाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३६८ वर पोहोचली आहे. लागण झालेल्यांपैकी ४० जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.
मंगळवारी राज्याच्या विविध भागांमधील सुमारे ११ हजार जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार संशयितांना ऑसेलटॅमीवीर औषधे देण्यात आली आहेत. दिवसभरात स्वाइन फ्लूची लागण झालेले ७९ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे लागण झालेल्यांची संख्या ३ हजार २७३ च्या घरात पोहोचली आहे. पूर्णपणे बरे झालेल्या ८७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये नाशिकमधील दोघांचा, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर, सांगली, रत्नागिरी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
------------------

Web Title: 8 people died due to swine flu on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.