शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

हातात धरून पुस्तक- पेपर वाचल्यानं होतात 8 फायदे. वाचनानं अल्झायमरसारखे आजार राहतात दहा हात दूर.

By admin | Updated: June 8, 2017 18:21 IST

संशोधन सांगतंय तुम्हाला तुमचा विकास व्हावा असं वाटत असेल तर वाचनाची सवय गंभीरतेने लावा आणि असली तर वाढवा.

-माधुरी पेठकरकाही वर्षांपूर्वी जर कोणाला ‘तुमची आवड काय आहे?’ ‘तुम्हाला काय आवडतं? असं विचारलं की बहुतेकजण ‘मला वाचनाची आवड आहे’ म्हणून सांगायचे. पण आता हाच प्रश्न विचारला तर उत्तरं अनेक येतात. पण त्यात वाचनाची आवड असलेले खूप कमीजण आढळतात. स्मार्ट फोन, कम्प्युटर, गुगल, यू ट्यूब यामुळे वाचन संस्कृती थोडी मागे पडली आहे.पूर्वी ‘वाचाल तर वाचाल’ या नियमाप्रमाणे घरातले मोठे मुलांना वाचायलाच सांगायचे. दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना भरपूर वाचायला मिळावं यासाठी वाचनालय लावून द्यायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना वाचा वाचा म्हणून सांगणारे मोठे स्वत:ही दिवसभरात हातात पुस्तक, मासिक नाहीच काही तर पेपर तरी पूर्ण वाचायचे. पण हल्ली वाचनाची आवड कमी झालीये. काहींच्या बाबतीत त्यांना वाचनाची आवड आहे पण सवड मिळेनाशी झाली आहे. तर कोणाला हातात पुस्तक आणि पेपर धरून वाचायला आवडत नाही. अनेकजण धावतपळत संगणकावर गुगलवरून जेवढं वाचतात तेवढंच वाचण्यात आनंद मानत आहे. हे असं जरी असलं तरी संशोधन मात्र वाचत राहा या सल्ल्यावर ठाम आहे. वाचनाच्या संदर्भात गेल्या काही दिवसात जगभरात जे संशोधन झालं ते हेच सांगतं की तुम्हाला तुमचा विकास व्हावा असं वाटत असेल तर वाचनाची सवय गंभीरतेने लावा आणि असली तर वाढवा. आणि वाचन म्हणजे एका जागी निवांत बसून हातात पुस्तक धरून वाचणं संशोधनाला अभिप्रेत आहे. वाचनाच्या सवयीवर विविधअंगांनी जे संशोधन झालं आहे ते वाचनाचे शरीर आणि मनावर कसे चांगले आणि सकारात्मक परिणाम होतात हेचं सांगतं. जगण्याच्या दिशेपासून जगण्याच्या समाधानापर्यंत सर्व काही वाचनातून मिळू शकतं असा अभ्यास सांगतो.

 

    वाचल्यानं नेमकं काय होतं?1. हुशारी वाढते.संशोधक याबद्दल सांगतात की जेवढं तुम्ही वाचाल तितक्या अधिक विषयांची माहिती तुम्हाला होईल. पुस्तकाच्या माध्यमातून अख्खं जग समजून घेता येतं. लहान मुलांच्या हुशारीच्या बाबतीत तर वाचन खूप फायदेशीर ठरतं. मुलं भाषा ऐकून आणि वाचूनच शिकतात. पण उत्तमरित्या भाषा शिकण्याचं माध्यम म्हणजे त्या भाषेतलं पुस्तक वाचन. वाचण्यामुळे वाचणाऱ्याची शब्दसंपदा वाढते. वाचनाची ही सवय लहान वयातच विकसित झाली तर मोठेपणी वाचणारी व्यक्ती हुशार असण्याचीच पूर्ण शक्यता असते असं संशोधकांनी म्हटलंय. 2. मेंदूची क्षमता वाढते. वाचनामुळे अनेकविध विषयांची माहिती मिळून वाचणारा स्मार्ट तर होतोच. पण वाचनाच्या नियमित सवयीमुळे मेंदूची क्षमताही वाढते. ज्याप्रमाणे जॉगिंग, व्यायाम याचा फायदा शरीर आणि हदय सक्षम होण्यास होतो तसाच वाचनामुळे मेंदूचाही व्यायाम होवून मेंदू कार्यक्षम होत असतो. वाचनामुळे मेंदू कामाला लागतो आणि त्यातून स्मरणशक्ती वाढते. वयोमानानं स्मरणशक्ती कमी होते, मेंदूची कार्यक्षमताही कमी होते. पण नियमित वाचनाची सवय असेल तर वयोमानाचे स्मरणशक्तीवर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामाची तीवता खूपच कमी असते. वाचनामुळे मेंदू, बुध्दी आणि स्मरणशक्ती दीर्घकाळापर्यंत टोकदार राहू शकते.

 

 

 

           3. वाचनामुळे संवेदनशीलता वाढते.वाचनामुळे इतरांना समजून घेण्याची माणसातली शक्ती वाढते. वाचनामुळे इतर लोकांना काय वाटतं? हे समजून घेण्याची क्षमता वाढते. त्यातही तुम्हाला जर फिक्शन वाचण्याची सवय असेल तर हा परिणाम नॉन फिक्शन वाचण्याच्या तुलनेत जास्त दिसतो. 4. समजण्याच्या शक्तीमध्ये होते वाढ. बरेचजण वाचायचं म्हणून वाचत नाही. वाचताना अनेकांना नोटस काढून ठेवण्याची सवय असते.एखादी गोष्ट नीट समजली नसेल तर त्याची नोंद करून ठेवून नंतर ती समजून घेतात. वाचनामुळे समजून उमजून घेण्याची शक्ती वाढते.5. अल्झायमर आजाराशी लढण्याची ताकद मिळते. वाचन हे मेंदूला कामाला लावतं. जसं बुध्दीबळ खेळणं, कोडं सोडवणं हे करताना मेंदू जसा अ‍ॅक्टिव्ह होतो तसाच वाचन करताना मेंदू कामाला लागतो. मेंदूला सतत कामाला लावणं महत्त्वाचं असतं. मेंदूचं काम जर थंडावलं तर अल्झायमर सारख्या मानसिक आजारांची शक्यता वाढते. वाचनासारखी सवय मेंदूला कामात ठेवून या आजारापासूनही लांब ठेवते.6. मेंदू आणि मनाला आराम मिळतो. दिवसभरातल्या कामानं आलेला तणाव घालवायचा असेल तर सरळ दिवसाच्या शेवटी मस्त अर्धा तास वाचन करा. वाचनामुळे मनावरचा आणि मेंदूवरचा सर्व ताण निघून जातो. वाचन करताना पुस्तकात/ लेखात गुंतल्यानं मनातल्या सर्व चिंता काही काळ तरी गळून पडतात. म्हणूनच वाचन हे मनाला आराम मिळवण्याचं चांगलं माध्यम आहे.

 

 

 

              7. वाचनामुळे शांत झोप येते.झोपायला जाण्याआधीची चांगली सवय म्हणूनही वाचनाकडे बघता येतं. वाचनामुळे मन आणि बुध्दी शांत होते. हातात धरून पुस्तक वाचनामुळे मनाला खरी शांतता मिळते. मोबाइल किंवा संगणाकाच्या स्कीनवर वाचन करून डोळ्यांवर आणि बुध्दीवर ताणच येतो. हातात धरून वाचलेलं पुस्तकच मनाला हवी असलेली शांतता देवू शकतं. म्हणून झोपायला जाण्याआधी किमान वीस मीनिटं तरी हातात पुस्तक, पेपर धरून काहीतरी वाचायला हवं. 8. वाचनानं वाचन वाढतं.आज हातात पुस्तक, पेपर धरून वाचन कमी झालेलं असलं तरी बहुतांश पालकांना वाटतं की त्यांच्या मुलांनी पुस्तकं वाचावीत. असं वाटत असेल तर मुलांना रोज मोठ्यानं गोष्टी वाचायला सांगा. जसजशी मुलं वाढतील त्यांच्यातील वाचनाची सवय नुसती कायम राहात नाही तर ती वाढते. याउलट बहुतांश घरात मुलं मोठ्यानं वाचत असतील तर त्यांना टोकलं जातं आणि त्यांना मनातल्या मनात वाचण्याचा आग्रह केला जातो. पण त्यामुळे कदाचित त्यांची लहानपणाची वाचनाची सवय पुढे कॅरी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मुलांना जर मोठयानं वाचण्याची सवय असेल तर त्यांना तसं वाचू द्या.