शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बहुगुणकारी लवंगाचे सेवन करा आणि या समस्यांतून मुक्तता मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 14:49 IST

भारतीय मसाल्यांमध्ये लवंगाचा वापर खाद्यपदार्थांचा आस्वाद वाढवण्यासाठी केला जातो. जेवणाची चव वाढवण्याशिवाय लवंगीचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत.

भारतीय मसाल्यांमध्ये लवंगाचा वापर खाद्यपदार्थांचा आस्वाद वाढवण्यासाठी केला जातो. जेवणाची चव वाढवण्याशिवाय लवंगाचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. औषधी गुणांमुळे कित्येक आजारांवर लवंग ही बहुगुणकारी आहे. दातांचे दुखणे, तोंडाची दुर्गंधी, घसा खवखवणे यांसारख्या आजारावर लवंग बहुगुणकारी आहे. लवंगमध्ये प्रोटीन, लोह, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम आणि सोडियम अॅसिडचे भरपूर प्रमाण आहे. आजारांना समूळनष्ट करण्याचे काम लवंग करते. जाणून घेऊया लवंगीचे औषधी गुण 

1. गॅसच्या समस्येपासून मुक्तता :धकाधकीचे आयुष्य, जंक फूड आणि रस्त्यावरील उघड्या पदार्थांच्या सेवनामुळे गॅसेसच्या समस्या उद्भवतात. यामुळे पोटदुखीचा त्रास होता. या त्रासातून तात्काळ सुटका व्हावी, यासाठी आरोग्यास अपायकारक ठरतील अशा औषधांचे सेवन केले जाते. हानिकारक औषधांऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करावा. गॅसेसच्या समस्येवर लवंग गुणकारी औषध आहे. गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब मिसळून प्यावे. याने पोटाला आराम मिळतो. 

2.सर्दी खोकल्याचा त्रास होतो कमी : बदलत्या हवामानानुसार अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत असतो. या त्रासातून लवंग नक्कीच तुमची सुटका करेल.  सर्दी-खोकला किंवा घशामध्ये खवखव होऊ लागल्यास तोंडामध्ये एक लवंग ठेवावी. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होईल. 

3. तोंडाची दुर्गंधी : पायरिया आजारानं ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती बराच वेळ उपाशी पोटी राहिल्यास त्यांच्या तोंडाला दुर्गंध येऊ शकते. दुर्गंधीची ही समस्या दूर करण्यासाठी 40 ते 45 दिवस सलग रोज सकाळी अख्ख्या लवंगीचे सेवन करावे.  

4. चेहऱ्यावरील डागांची समस्या :लवंग आपले सौंदर्याला आणखी तेजस्वी करण्याचेही काम करते. चेहऱ्यावर मुरुमांचे डाग, डार्क सर्कल अशा समस्या असल्यास लवंगाचा वापर करावा. लवंगाची पावडर आणि बेसनचा पॅक चेहऱ्यावर लावावा. पण हा फेसपॅक अप्लाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण लवंग गरम असते यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते.

5. केसगळती रोखण्यास मदत :बहुतांश जण केसगळती आणि केसांच्या रुक्षपणामुळे हैराण असतात. ही समस्या लवंगामुळे कमी होऊ शकते. यासाठी पाण्यामध्ये लवंग उकळावी आणि त्या पाण्यानं केस धुवावेत. यानंतर तुम्हाला चमकदार आणि मजबूत केस पाहायला मिळतील.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स