शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

काय आहे अल्झायमर आजार? जाणून घ्या संकेत आणि लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 11:28 IST

अल्झायमर (Alzheimer's Disease)  हा आजार विसरण्याशी संबंधित आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे ही आहेत.

अल्झायमर (Alzheimer's Disease)  हा आजार विसरण्याशी संबंधित आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे ही आहेत. रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्यावर जखम झाल्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते. या आजारावर अजून काहीही ठोस उपाय नसून सुरुवातीच्या काळात नियमीत तपासणी आणि उपचाराने यावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं.  आम्ही तुम्हाला ७ असे संकेत सांगणार आहोत ज्या अल्झायमर झाल्याकडे इशारा करतात. 

१) स्मरणशक्ती कमी होणे

नाव विसरणे, वस्तू हरवणे, ठरवलेल्या गोष्टी विसरणे, शब्द लक्षात न ठेवू शकणे, गोष्टी शिकण्यात आणि त्या लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होणे या सामान्य बाबी असतात. या आजाराने तुमची पूर्ण स्मरणशक्ती पुसली जाऊ शकते. त्यासोबतच तुम्ही कुणालाही ओळखू शकणार नाहीत. 

२) कोणत्याही गोष्टीचा निर्णय न घेऊ शकणे

हा आजार झाला असेल तर तुमची निर्णय क्षमता कमी होते. पर्यायांमधून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय घेताना अनेक अडचणी तुम्हाला येऊ शकतात. 

३) शारीरिक ताळमेळ बसवण्यात समस्या

शरीरावर नियंत्रण न राहिल्याने तुम्ही पडूही शकता किंवा जेवण तयार करणे, ड्रायव्हिंग करणे, घरातील इतर कामे करतांना तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. आजार जास्तच वाढला असेल तर तुम्ही रोजची कामे जसे की, आंघोळ करणे, कपडे परिधान करणे, तयार होणे, जेवण करणे, टॉयलेटला जाणे यांसारखी कामे कुणाच्याही मदतीशिवाय करु शकणार नाहीत.  

४) अंकांची ओळख न होऊ शकणे

या आजारामुळे तुम्हाला अक्षरांची किंवा अंकांची ओळख करण्यास त्रास होऊ शकतो आणि हिशोब करण्यासही समस्या येऊ शकते. 

५) वेळ, तारीख आणि ठिकाण विसरणे

या आजाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला वेळ, तारीख आणि दिवस तसेच ओळखीची ठिकाणेही लक्षात राहत नाहीत. तुम्ही तुमच्या घराचा पत्ताही विसरु शकता. तुम्ही काय काम करता हेही विसरु शकता. 

६) बोलण्यात अडचण

हा आजार तुम्हाला झाला असेल तर तुम्ही एकही भाषा नीट बोलू शकणार नाहीत. तसेच तुम्हाला वाटतं ते शब्दात व्यक्त न करता येणे किंवा लिखित अक्षरे समजण्यासही अडचण होऊ शकते. 

७) व्यक्तीमत्वात बदल

तुम्ही विनाकारण आक्रामक होऊ शकता किंवा चिंतेत राहू शकता. हा आजार झाल्यावर तुम्ही तसे सामान्य व्यक्तीच असता पण तुमच्या व्यक्तिमत्वात अचानक बदल होतो. आणि जसेही तुम्ही यातून बाहेर येता तेव्हा पुन्हा शांत व्यक्ती होता.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य