‘हार्ट अटॅक’ येण्यापूर्वी ६७ टक्के रुग्णांना पडले भयावह स्वप्न; स्लीप मेडिसीन विभागाचा अभ्यास

By सुमेध वाघमार | Published: March 14, 2024 07:25 PM2024-03-14T19:25:01+5:302024-03-14T19:25:56+5:30

सुमेध वाघमारे, नागपूर: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्वसनरोग विभाग व स्लीप मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या नेतृत्वात हृदय ...

67 percent of patients had nightmares before having a heart attack; Study of the Department of Sleep Medicine | ‘हार्ट अटॅक’ येण्यापूर्वी ६७ टक्के रुग्णांना पडले भयावह स्वप्न; स्लीप मेडिसीन विभागाचा अभ्यास

‘हार्ट अटॅक’ येण्यापूर्वी ६७ टक्के रुग्णांना पडले भयावह स्वप्न; स्लीप मेडिसीन विभागाचा अभ्यास

सुमेध वाघमारे, नागपूर: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्वसनरोग विभाग व स्लीप मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या नेतृत्वात हृदय विकाराचा झटका आलेल्या ३७ रुग्णांच्या झोपेचा अभ्यास केला असता यातील २९ (७८ टक्के) रुग्णांना झोपेची समस्या होती. हृदय विकाराचा झटका येण्यापूर्वी २५ रुग्णांना (६७ टक्के) भयावह स्वप्न पडले होते. अपुºया झोपेसोबतच आंतरिक अवयवांची संरचना व क्रियामध्ये बिघाड झाल्याने हे भयावह स्वप्न पडले असावे, असा निष्कर्ष काढण्यात आला.

झोप ही आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. झोपेच्या समस्येमुळे मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती, कर्करोग, स्लीप अ‍ॅपनिया, डिमेंशिया, मानसिक आजाराचा धोका संभवतो. या गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी पुरेशी व गुणवत्तापूर्ण झोप आवश्यक आहे. याचे महत्त्व विषद करण्यासाठी डॉ. मेश्राम आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या चमूने हा अभ्यास केला.

८ रुग्णांना पहाटे आला हृदय विकाराचा झटका

‘लोकमत’शी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले, हृदय विकाराचा झटका आलेल्या ३७ रुग्णामध्ये २१ पुरुष व १६ महिलांचा समावेश होता. यातील २९ रुग्णांना अपुरी व गुणवत्तापूर्ण झोपेची समस्या होती. यातील २९ रुग्णांना दिवसा, तर ८ रुग्णांना पहाटे ३ ते ६ वाजताच्या दरम्यान हृदय विकाराचा झटका आला.

२५ रुग्णांना पडले भयावह स्वप्न- अभ्यासात असे आढळून आले की, ३७ पैकी २५ रुग्णांना भयावह स्वप्न पडले. यात १६ पैकी १२ महिलांना (७५ टक्के) तर २१ पैकी १३ पुरुषांना (६२ टक्के) हे स्वप्न पडले होते.

‘रिस्क फॅक्टर’ला गंभीरतेने घ्या!

हृदय विकाराचा झटका आलेल्या ३७ रुग्णांपैकी ७२ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब, ४० टक्के रुग्णांना मधुमेह, १८ टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन, २४ टक्के रुग्णांना मद्यपानाचे व्यसन तर २८ टक्के रुग्णांना तंबाखूचे व्यसन होते. या शिवाय, अपुरी व गुणवत्तापूर्ण झोपेचा अभाव हे हृदय विकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरले, असाही निष्कर्षही यातून निघतो. यामुळे या ‘रिस्क फॅ क्टर’ला गंभीरतेने घ्या, असा सल्ला डॉ. मेश्राम यांनी दिला.

झोप ही आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण

:: झोप ही पोषण आणि शारिरीक सक्रीयता एवढीच गरजेची आहे
:: झोप ही स्मृतीवाढीसाठी आवश्यक आहे
:: झोप ही मानसिक आरोग्य सुदृढ करते
:: झोप रोगप्रतिकारशक्तीची सुरक्षा करते
:: झोप ही रोगप्रतिकारशक्तीला विषाणू आणि जीवाणू नष्ट करण्यास मदत करते
:: झोप ही जुन्या पेशींना पूर्नजीवीत करून शरीराची उर्जा योग्य प्रमाणात ठेवते
-आरोग्यादायी झोपेसाठी हे करा
:: वयस्क लोकांनी ७ ते ८ तास झोप घ्या
:: झोपेच्यावेळी कॅ फिन असणारे पदार्थ खाऊ-पिऊ नका
:: रात्री झोपेच्यावेळी जड आहार घेऊ नका
:: झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉपापासून दूर रहा
:: झोपेची व उठण्याची वेळ फिक्स करा.
:: उशीरा झोपेले असालतरी उठण्याची वेळ ठाराविक ठेवा
:: नियमीत व्यायाम करा
:: तणावाचे व्यवस्थापन करा

Web Title: 67 percent of patients had nightmares before having a heart attack; Study of the Department of Sleep Medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.