देशातील नोकरदारांच्या आरोग्याबाबत धक्कादायक खुलासा, लठ्ठपणा वाढण्याचं कारणही स्पष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 10:22 AM2019-09-10T10:22:14+5:302019-09-10T10:24:34+5:30

देशाच्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी करणारा नोकदार वर्गाच्या आरोग्याबाबत धक्कादायक खुलासा करणारा एक रिपोर्ट समोर आला आहे.

63 percent of corporate executives in India are unfit and overweight says report | देशातील नोकरदारांच्या आरोग्याबाबत धक्कादायक खुलासा, लठ्ठपणा वाढण्याचं कारणही स्पष्ट!

देशातील नोकरदारांच्या आरोग्याबाबत धक्कादायक खुलासा, लठ्ठपणा वाढण्याचं कारणही स्पष्ट!

Next

देशाच्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी करणारा नोकरदार वर्गाच्या आरोग्याबाबत धक्कादायक खुलासा करणारा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, देशातील ६३ टक्के प्रोफेशनल्स ओव्हरवेट आहेत. तसेच त्यांचा बॉडी इंडेक्स २३ पेक्षा अधिक आहे. फिटनेस लेव्हल ऑफ कार्पोरेट इंडियाच्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. हा रिसर्च 'हेल्दीफाय मी' या अ‍ॅपसोबत मिळून करण्यात आला. हा रिसर्च २० पेक्षा अधिक कंपन्यांमधील २०-२१ वयाच्या ६० हजार प्रोफेशनल्सवर करण्यात आला. यात फॅक्टरी वर्कर आणि सेल्स प्रोफेशनल्सचा देखील समावेश होता.

१२ महिने केला रिसर्च

दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि हैद्राबादसारख्या मोठ्या शहरातील प्रोफेशनल्सना या रिसर्चमध्ये सामिल करण्यात आले होते. रिसर्चदरम्यान त्यांचं खाणं-पिणं, आजार आणि आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. सर्वच प्रोफेशनल्स हेल्दीफायमीच्या १२ महिने चाललेल्या वेलनेस प्रोग्रॅमचा भाग होते. हे सगळेच एका दिवसात किती पावले चालतात, हेही जाणून घेण्यात आलं.

काय आलं समोर?

या रिसर्चमधून समोर आले की, कंज्यूमर गुड्स सेक्टरचे प्रोफेशनल्स दिवसभरात सरासरी ५, ९८८ पावले चालतात. तेच फायनान्स सेक्टरमधील लोक ४, ९६९ पावले चालतात आणि आयटी-मॅन्युफॅक्चरिंगचे लोक रोज ५ हजार पावले चालतात. या रिसर्चमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, जास्तीत जास्त प्रोफेशनल्स त्यांचं अर्ध आयुष्य ऑफिसमध्ये जगत आहेत आणि सक्रिय युद्धा नाहीत. याचा परिणाम म्हणजे त्यांचं वजन अधिक वाढत आहे.

फिटनेस कसं?

रिसर्चमधून समोर आले की, जास्तीत जास्त भारतीय प्रोफेशनल्स वीकेंडला आळशी होतात आणि फिजिकल अ‍ॅक्टिवही नसतात. वर्कआउट करणं फार कमी पसंत करतात. ते रोज ३०० कॅलरी बर्न करतात, तर वीकेंडला हा आकडा २५० वर येतो.

खाण्या-पिण्याच्या सवयी काय?

रिसर्चनुसार, भारतीय प्रोफेशनल्सच्या आहारात फॅट आणि कार्बोहायड्रेटचा अधिक समावेश आहे. यानेच ते लठ्ठ होत आहेत. नाश्त्यातील फॅटमुळे त्यांना २९.८ टक्के एनर्जी मिळते. तेच लंचमधून त्यांना २५.६२ टक्के आणि डिनरमधून त्यांना २५.९० टक्के फॅट मिळतं. पण भारतीयांमध्ये सर्वात जास्त फॅट ३३.७१ टक्के स्नॅक्समधून घेतात. हेच ओव्हरवेट होण्याचं मुख्य कारण आहे. यांच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन १७.३१ टक्के, लंचमध्ये १४.३ टक्के आणि डिनरमध्ये प्रोटीनचं प्रमाण केवळ १७.३१ टक्के होतं.

वर्कआउट कोणता करतात?

रिसर्चनुसार, महिला असो वा पुरूष फिट राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रोफेशनल्सची आवडती एक्सरसाइज आहे रनिंग. त्यानंतर ते सायकलिंग, जिम वर्कआउट आणि स्वीमिंगला महत्व देतात. तेच महिला प्रोफेशनल्स फिट राहण्यासाठी इनडोअर अ‍ॅक्टिविटीसारखे जसे की, योगाभ्यासाचा रूटीनमध्ये समावेश आहे.

Web Title: 63 percent of corporate executives in India are unfit and overweight says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.