शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'या' चुकीच्या सवयींमुळेही तुम्हाला होऊ शकते मायग्रेनची समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 17:32 IST

मायग्रेनचा त्रास होण्याची समस्या आज अनेकांना होत आहे. या वेदनादायी त्रासातून सुटका मिळण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. पण ही समस्या कशामुळे होते याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही.

मायग्रेनचा त्रास होण्याची समस्या आज अनेकांना होत आहे. या वेदनादायी त्रासातून सुटका मिळण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. पण ही समस्या कशामुळे होते याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. वेळेवर यावर उपचार न केल्यास ही समस्या अधिक वाढत जाते. जनरली अर्ध डोकं दुखणे किंवा पूर्ण डोकं दुखण्यासोबत मानेच्या खालच्या भागातही वेदना होतात. पण कोणत्या चुकीच्या सवयींमुळे मायग्रेनची समस्या होते हे आज जाणून घेऊया.....

खूप जास्त तणाव

मायग्रेनची समस्या होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तणाव आहे. ज्या व्यक्तींना जास्त तणावाचा सामना करावा लागतो त्यांच्यांमध्ये मायग्रेन अधिक आढळतो. तणाव, डिप्रेशन आणि रागाच्या स्थितीत अत्यंत संवेदनशील असलेल्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. थोड्या थोड्या वेळाने मूड बदलणे हेही मायग्रेनचं लक्षण आहे. तज्ज्ञांनुसार, अनेक रुग्णांमध्ये हे आढळतं की, ते अचानक डिप्रेशनमध्ये येतात आणि थोड्या वेळाने काहीही कारण नसताना नॉर्मल होतात. 

घट्ट कपडे

फार घट्ट किंवा टाईट कपडे परिधान केल्याने पोटावर प्रेशर येतं, ज्यामुळेही डोकेदुखी होते. जास्तवेळ पोट आत दाबून ठेवल्यानेही कधी कधी पोट फुटेल की काय असं वाटतं. त्यामुळे या त्रासापासून वाचायचे असेल तर जास्त टाइट कपडे परिधान करु नका किंवा जेवताना पोट टाइट ठेवू नका. 

वेळेवर जेवण न करणे

जर तुम्ही वेळेवर योग्य प्रमाणात जेवण न केल्यास आणि खूपवेळ उपाशी राहिल्यानेही मायग्रेनचा झटका येऊ शकतो. त्यासोबत जास्त प्रमाणात मद्यसेवन, वातावरणातील बदल, आहारातील बदल आणि कमी झोप घेणे यामुळेही ही समस्या जाणवते. 

कमी पाणी पिणे

पाणी हे आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे काही वेगळं सांगायला नको. पाण्यात आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठीचे अनेक उपयुक्त तत्व असतात. पण अनेकदा काही लोक आवश्यक तितकं पाणी पित नाहीत. त्यामुळे ही समस्या निर्माण होते. 

व्हिटॅमिन्सची कमतरता

व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये मायग्रेनची समस्या होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला मायग्रेनची लक्षणे दिसली तर व्हिटॅमिन्सची तपासणी करा. मायग्रेनने ग्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डी, रायबोफ्लेबिन आणि कोइंजाम क्यू-१० या व्हिटॅमिन्सची कमतरता आढळते.

जास्त प्रमाणात चहाचं सेवन

अनेकदा चहाच्या अधिक सेवनामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो. चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे ही समस्या होते. पुडिंग किंवा केकमध्येही कफिनचा वापर होतो. त्यामुळेही डोकेदुखी होते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य