काय सांगता! कोरोनाला रोखण्यासाठी ६ फुटाचं सोशल डिस्टन्सिंग पुरेसं नाही, संशोधनातून धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:10 PM2021-09-16T14:10:40+5:302021-09-16T14:12:08+5:30

कोरोना हवेतील कणातून पसरतो. त्यामुळे बंदिस्त खोल्यांमध्ये तो जास्त पसरला जाऊ शकतो, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे. ६ फुट म्हणजे २ मीटर अंतर हे करोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेसं नाही, असं 'सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटीज' या नियतकालिकात म्हटलं आहे.

6 feet means 2 meter social distance is not enough to control the spread of corona virus in home study shows | काय सांगता! कोरोनाला रोखण्यासाठी ६ फुटाचं सोशल डिस्टन्सिंग पुरेसं नाही, संशोधनातून धक्कादायक दावा

काय सांगता! कोरोनाला रोखण्यासाठी ६ फुटाचं सोशल डिस्टन्सिंग पुरेसं नाही, संशोधनातून धक्कादायक दावा

Next

कोरोना प्रतिबंधासाठी सहा फूट अंतर पुरेसं नसल्याचं एका अभ्यासातून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोना हवेतील कणातून पसरतो. त्यामुळे बंदिस्त खोल्यांमध्ये तो जास्त पसरला जाऊ शकतो, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे. ६ फुट म्हणजे २ मीटर अंतर हे करोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेसं नाही, असं 'सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटीज' या नियतकालिकात म्हटलं आहे.

सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर हाच कोरोनापासून वाचण्याचा उपयुक्त मार्ग असल्याचं आपण गेल्या दीड वर्षापासून म्हणतोय. तसंच सोशल डिस्टंसिंगमध्ये ६ फूटांचं अंतर ठेवण्यात येतंय. मात्र आता नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार, घरामध्ये २ मीटर म्हणजेच ६ फूटांचं अंतर आता कोरोनाचं संक्रमण दूर ठेवण्यासाठी पुरेसं नसल्याचं समोर आलेलं आहे.

या नव्या अभ्यासानुसार, एयरबोर्न एरोसॉल्स हे व्हायरस हवेतून वाहुन नेण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे ६ फुटांचे अंतर घरामध्ये एयरबोर्न एरोसॉल्सला प्रतिबंध करण्यासाठी पुरेसं नाही. सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे निष्कर्ष असं सुचवतात की, श्वासोच्छ्वासातून बाहेर पडणाऱ्या एरोसॉल्सला मानवी संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी केवळ सोशल डिस्टंन्सिंग पुरेसं नाही. तर मास्क लावणं आणि घरातील हवा खेळती राहील, अशी व्यवस्था असणं गरजेचं आहे.

या संशोधनासाठी संशोधकांनी एका जागेवर किती प्रमाणात हवा खेळती राहते याचा दर, इनडोअर एअरफ्लो पॅटर्न आणि बोलताना तसंच श्वास घेताना किती प्रमाणात ऐरोसोल बाहेर पडतात याचं प्रमाण, या सर्व घटकांची तपासणी केली. त्यावरुन असे निष्कर्ष निघाले की, एरोसॉल्सचे आकारमान १ ते १० मायक्रोमीटर असते. हे एरोसॉल्स SARS-CoV-2 वाहून नेऊ शकतात. हा विषाणू कोरोना होण्यास कारणीभूत आहे.

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीचे लेखक आणि अभ्यासक जेन पे म्हणाले, की "आम्ही कोरोनाची लागण झालेल्या लोकांकडून श्वसनावाटे बाहेर टाकलेल्या व्हायरसयुक्त कणांच्या हवेतील प्रसार कसा होतो यावर संशोधन केले आबे. त्यामध्ये व्हायरस बंदिस्त जागेमध्ये पसरण्यापासून कसे रोखण्यात येईल. तसेच यामध्ये वेंटिलेशन आणि सोशल डिस्टन्सिंगचा कितपत फायदा होतो याचीही तपासणी केली आहे."

या अभ्यासातून असंही दिसून आलं की, कोरोना संक्रमित व्यक्ती जर मास्कशिवाय बोलत असेल तर त्याच्या बोलण्यातून विषाणू ६ फुट म्हणजेच २ मीटरच्या क्षेत्रात अवघ्या एका मिनिटात पसरतात. तसेत ज्या ठिकाणी हवा पुरेशी खेळती नसेल, त्याठिकाणी हे प्रमाण जास्त असल्याचंही समोर आलं आहे.

Web Title: 6 feet means 2 meter social distance is not enough to control the spread of corona virus in home study shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.