शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लढ्याला यश! ५८ वर्षीय महिलेला गुंतागुंतीच्या ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेनंतर मिळालं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 6:21 PM

हृदयविकाराच्या झटक्याने या रुग्णाच्या हृदयाच्या आत एक छिद्र पडले आणि त्यामुळे ‘व्हेन्ट्रिक्युलर सेप्टल रप्चर’ (व्हीएसआर) नावाची एक दुर्मिळ आणि जीवघेणी स्थिती निर्माण झाली होती

नवी मुंबई- 15 फेब्रुवारी 2021 : नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या सीमा रमेश म्हात्रे, वय वर्षे 58, या महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे 16 जानेवारी 2021 रोजी नवी मुंबईतील ‘रिलायन्स हॉस्पिटल’च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने या रुग्णाच्या हृदयाच्या आत एक छिद्र पडले आणि त्यामुळे ‘व्हेन्ट्रिक्युलर सेप्टल रप्चर’ (व्हीएसआर) नावाची एक दुर्मिळ आणि जीवघेणी स्थिती निर्माण झाली होती, असे तिच्या तपासणीत दिसून आले. डॉ. कमलेश जैन यांनी आपल्या शल्यक्रियेतील कौशल्याने या रुग्णावर अतिजोखीम असलेली, तातडीची शस्त्रक्रिया केली आणि तिचे प्राण यशस्वीपणे वाचवले. या मोठया शस्त्रक्रियेनंतर ही महिला आता बरी झाली असून, तिला घरी सोडण्यात आले आहे. तिची प्रकृती सुधारत आहे. 

‘व्हीएसआर’ ही एक दुर्मिळ व प्राणघातक स्वरुपाची शरीरातील गुंतागुंत आहे आणि शस्त्रक्रिया हाच यावर एकमेव प्रमाणित उपचार आहे. या आजारात हृदयाचे स्नायू अतिशय कमकुवत झाले असल्याने त्यास छिद्र पडलेले असते. ते छिद्र बुजवून त्या स्नायूंना फार नाजूकपणे टाके घालावे लागतात. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया फार आव्हानात्मक असते. ‘व्हीएसआर’वर उपचार फार क्लिष्ट असतात. त्यामध्ये अति काळजी घेण्याला महत्त्व असते. तसेच, इमेज घेणे, उपचार करणे आणि शस्त्रक्रिया करणे यांबाबतीतही अति कौशल्यांची आवश्यकता असते. ही शस्त्रक्रिया करताना रुग्ण दगावण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. खरे तर, हृदयावर करण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही शस्त्रक्रियांपेक्षा, या विशिष्ट शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

रिलायन्स हॉस्पिटल, नवी मुंबई येथील ‘कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जन’ डॉ. कमलेश जैन म्हणाले, “व्हीएसआरच्या स्थितीतील वृद्ध रुग्णांचे जगण्याचे प्रमाण खूपच कमी असते. या परिस्थितीत हृदयाच्या इतर भागांवर मोठा भार येतो. त्वरित निदान व उपचार झाले नाही, तर हार्टफेल होण्याचा व रुग्ण दगावण्याचा मोठा धोका असतो. सीमा म्हात्रे या रूग्णाची प्रकृती वेगाने ढासळत होती. त्यामुळे आम्ही रात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया 5 तासांपेक्षा जास्त काळ चालली आणि यशस्वी झाली. त्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.” 

रुग्णाचा मुलगा महेंद्र म्हात्रे यांनी आपला अनुभव सांगितला, “माझ्या आईला यापूर्वी कधीच मोठे आजार झाले नव्हते. आमच्या कुटुंबात आम्ही नेहमीच वार्षिक आरोग्य तपासणीबाबत जागरूक होतो आणि आईच्या तपासणीचे निष्कर्ष सामान्य स्वरुपातील होते. तिला हृदयविकाराचा झटका येणे, ही आम्हा सर्वांसाठी आश्चर्याची बाब होती. आम्ही घाबरलो होतो. माझ्या आईला सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी सर्वकाही करण्याची आमची तयारी होती. सुरुवातीला तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर, नवी मुंबईतील ‘रिलायन्स हॉस्पिटल’मध्ये अधिक सुविधा व कुशल डॉक्टर उपलब्ध असल्याने आम्हाला येथे दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. coronavirus: अखेर कोरोनाविरोधात रामबाण उपाय सापडला, असं होणार विषाणूचं काम तमाम

‘व्हीएसआर’वर उपचार करण्यात निष्णात असलेल्या काही रुग्णालयांपैकी हे रुग्णालय आहे. त्वरीत निर्णय घेणे आम्हाला भाग होते. डॉ. कमलेश आणि त्यांच्या टीमने अत्यंत निपुणतेने आणि सौहार्दपूर्ण रितीने उपचार केले. त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले आणि आश्वासितही केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.” कोरोनामुळे प्रजनन क्षमतेवर होतोय गंभीर परिणाम; या उपायानं मिळणार दिलासा, संशोधनातून खुलासा

अतिदक्षता विभागात पाच दिवस ठेवण्यात आलेल्या या महिलेवर सतत देखरेख ठेवण्यात येत होती व तिची नर्सिंगची काळजी घेण्यात येत होती. 24 जानेवारी, 2021 रोजी डिस्चार्ज देताना ती स्वस्थ होती. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्याकडून उपचारांनंतरचा पाठपुरावा नियमितपणे सुरू आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart DiseaseहृदयरोगNavi Mumbaiनवी मुंबई