शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

जगभरातील ५२ टक्के लोक डोकेदुखीमुळे बेजार, शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा निष्कर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 11:12 IST

डोकेदुखीचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये मायग्रेन, सामान्य स्वरूपाची डोकेदुखी, तणावामुळे होणारी डोकेदुखी आदी गोष्टींचा समावेश आहे.

ओस्लो : जगातील सुमारे ५२ टक्के लोकांना दरवर्षी डोकेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते, असा निष्कर्ष नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनातून काढला आहे. त्यातील काही लोकांमध्ये डोकेदुखीचा आजार गंभीर स्वरूप धारण करतो, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

डोकेदुखीचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये मायग्रेन, सामान्य स्वरूपाची डोकेदुखी, तणावामुळे होणारी डोकेदुखी आदी गोष्टींचा समावेश आहे. १९६१ ते २०२० सालापर्यंतच्या कालावधीत डोकेदुखीसंदर्भात जे संशोधन झाले, त्याचा अभ्यास नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनी केला. तसेच हा आजार असलेल्या अनेक रुग्णांच्या आजाराबाबतच्या माहितीचे त्यांनी सखोल विश्लेषण केले. (वृत्तसंस्था)

२६% लोकांनातणावामुळे डोकेदुखीनॉर्वेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, जगात डोकेदुखीने हैराण झालेल्या रुग्णांपैकी १४ टक्के लोकांना मायग्रेन तर २६ टक्के लोकांना तणावामुळे डोकेदुखीला सामोरे जावे लागते. या लोकांपैकी काही जणांचा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. दरदिवशी जगातील लोकसंख्येपैकी १५.८ टक्के लोक डोकेदुखीने बेजार असतात.

- मायग्रेनच्या रुग्णांमध्ये १७% महिला, ८.५% पुरुष- ६ टक्के महिलांमध्ये डोकेदुखीचा आजार पंधरा किंवा त्याहून अधिक दिवस कायम राहतो. अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण २.९ टक्के आहे.- २०१९ साली डोकेदुखीच्या आजारासंदर्भात एक पाहणी करण्यात आली होती. त्यात म्हटले होते की, ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण अधिक आहे.

स्मार्टफोन, संगणक डोकेदुखीचे कारण- मायग्रेनची समस्या वाढण्याची अनेक कारणे आहेत. संशोधकांनी सांगितले की, मानसिक, शारीरिक कारणांबरोबरच पर्यावरणातील बदलांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.- आधुनिक तंत्रज्ञानामुळे विकसित २. झालेल्या स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा अनेक उपकरणांचा दैनंदिन वापर वाढला आहे. त्यामुळेही मायग्रेनच्या समस्येला सामोरे जावे लागते.

टॅग्स :Healthआरोग्य