शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'हे' 5 पदार्थ ठरतील गुणकारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 18:59 IST

हिमोग्लोबिनप्रमाणेच रक्तातील महत्त्वाचा घटक म्हणजे प्लेटलेट्स. रक्त पातळ होऊ न देण्याचे काम प्लेटलेट्स करत असतात. तसेच शरिराला जखम झाल्यास अधिक प्रमाणावर होणारा रक्तस्राव रोखण्याचे कामही प्लटलेट्स करतात.

हिमोग्लोबिनप्रमाणेच रक्तातील महत्त्वाचा घटक म्हणजे प्लेटलेट्स. रक्त पातळ होऊ न देण्याचे काम प्लेटलेट्स करत असतात. तसेच शरिराला जखम झाल्यास अधिक प्रमाणावर होणारा रक्तस्राव रोखण्याचे कामही प्लटलेट्स करतात. आपल्या शरिरात लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स या तीन प्रकारच्या पेशी असतात. या पेशींपैकी रक्तात सर्वात जास्त प्रमाण हे प्लेटलेट्सचे असते. वैद्यकीय भाषेत प्लेटलेट्सला थ्रोम्बोसाईट्स असे म्हटले जाते. 

डेंग्यू, मलेरिया, अनुवंशिक आजार, केमोथेरपी ट्रिटमेंटमुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. निरोगी व्यक्तिच्या शरिरात सामान्यतः दीड हजार ते साडेचार लाख इतकी असते. शरिरातील प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर बाहेरून प्लेटलेट्स घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. औषधांनी प्लेटलेट्स वाढवता येत नाहीत. त्यामुळे पौष्टिक आहारातून शरिरातील प्लेटलेट्सचे प्रमाण वाढवता येते. आहारातून प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पुढील फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. 

पपई -

पपईसोबतच पपईच्या झाडांच्या पानांचाही शरिरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयोग होतो. डेंग्यूमुळे रूग्णाच्या शरिरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. त्यावेळी पपईच्या पानांच्या रसाचे सेवन केल्याने प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. 

पालक -

पालकच्या भाजीचाही प्लेटलेट्स वाढवण्यात मदत होते. पालकच्या भाजीमध्ये 'क' जीवनसत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. तसेच पालकचे सेवन केल्यामुळे रक्तस्रावाचा धोकाही कमी असतो. 

आवळा -

शरिरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळ्याचाही उपयोग होतो. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात 'क' जीवनसत्व असते. ज्यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. रोज 4 ते 5 आवळ्यांचे सेवन केल्याने रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण वाढते.

गुळवेल -

गुळवेलीचा रस रक्तातील प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी गुणकारक ठरते.

नारळ पाणी - 

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य