शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

लढ्याला यश! रक्ततपासणीने कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका कितपत हे कळू शकणार, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 3:50 PM

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसनं पिडित असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका किती असतो याबाबत संशोधन करण्यात आलं होतं. 

कोरोना व्हायरसचा धोका वातावरणातील बदलांमुळे वाढत आहे. आतापर्यंत कोणतीही लस किंवा औषध बाजारात उपलब्ध झालेलं नाही.  रशियानं केलेल्या दाव्यानुसार या महिन्यात कोरोनाच्या लसीचे रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. तसंच ऑक्टोबरपासून लसीकरण मोहिम सुरू करण्यात येणार आहे. सध्या कोरोना विषाणूंशी निगडीत नवनवीन शोध समोर येत आहेत.  कोरोना व्हायरसनं पिडित असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका किती असतो याबाबत संशोधन करण्यात आलं होतं. 

जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापिठातील संशोधकांनी पाच बायोमार्कर अणुंचा शोध घेतला ज्यांचा संबंध कोरोना रुग्णांच्या मृत्यूशी होता.  कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि शारीरिक स्थिती बिघडण्याशी याचा संबंध असतो. बायोमार्कर अणु रुग्णांच्या रक्तात असतात. याद्वारे मेडिकल इंडिकेटर्सचं काम केलं जातं. हे संशोधन जर्नल फ्यूचर मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमित २९९ रुग्णांवर हे परिक्षण करण्यात आलं होतं.

१२ मार्च ते ९ मे या दरम्यान जॉर्ज वॉशिंग्टन रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांचा यात समावेश होता. २९९ पैकी २०० रुग्णांमध्ये ५ बायोमार्कर अणु दिसून आले. सीआरपी, आइएल-6, फेरेटिन, एलडीएच आणि  डी-डिमर हे पाच बायोमार्कर अणु होते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार बायोमार्कर अणुंमुळे कोरोना संक्रमित रुग्णांच्या शरीरात जळजळ, सूज येणं, रक्तस्त्राव वाढणं अशी लक्षणं दिसून येत होती. त्यामुळे व्हेटिलेटरवर ठेवण्याची स्थिती उद्भवली होती.

जॉर्ज वॉशिंग्टन विदयापिठातील साहाय्यक प्राध्यापक आणि साहाय्यक तज्ज्ञ जॉन रिस यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये सुरूवातीला झालेल्या संशोधनातून दिसून आलं होतं की कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि बायोमार्कर अणु यांचा संबंध आहे. अमेरिकेतील संशोधनातूनही हीच बाब समोर आली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना रुग्णांचे उपचार करताना कोणाची शारीरिक स्थिती कितपत खालावत आहे, तसंच सुधारणा दिसून येत आहे. याबाबत कळणं कठीण असतं.

हे पण वाचा-

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार

मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याResearchसंशोधन