शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुरूषांसाठी संजीवनी ठरतात ही 5 फळं, हार्ट अटॅक अन् स्ट्रोकचाही राहणार नाही धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 10:30 IST

5 Best Fruits For Men : वयाच्या सगळ्याच टप्प्यांवर पुरूषांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी त्यांनी दैनंदिन पौष्टिक आहारासोबतच 5 फळं खाणं गरजेचं आहे.

5 Best Fruits For Men : जास्तीत जास्त पुरूष आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. ते कामात बिझी असल्याचं किंवा ते फिट असल्याचं कारण देतात आणि निष्काळजी होतात. पण आजकालच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात आणि त्यांना याची कल्पनाही नसते. चुकीच्या सवयी आणि लाइफस्टाईलमुळे जास्तीत जास्त पुरूषांना हाय ब्लड प्रेशरचा धोका असतो. ज्यामुळे कमी वयातच हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका वाढतो.

वयाच्या सगळ्याच टप्प्यांवर पुरूषांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी त्यांनी दैनंदिन पौष्टिक आहारासोबतच 5 फळं खाणं गरजेचं आहे. ही फळं शरीराला आवश्यक पोषक तत्व तर देतातच सोबतच ब्लड सर्कुलेशनही वेगाने होतं. त्याशिवाय पुरूषांची शक्ती वाढते.

अलिकडे पुरूषांना सगळ्यात जास्त हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक, हार्ट फेल, किडनी डॅमेज, नसा डॅमेज होणे, लैंगिक समस्या अशा गोष्टींचा जास्त सामना करावा लागत आहे. अशात जर या समस्या होऊ नये असं वाटत असेल तर खालील फळं नियमित खाणं गरजेचं आहे. 

डाळिंब

डाळिंबामध्ये पलीफेनॉल अॅंटी-ऑक्सिडेंट आणि नायट्रेट असतं. डाळिंब खाल्ल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि मांसपेशीचे टिश्यू हेल्दी होतात. अनेक रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, व्यायाम करण्याच्या 30 मिनिटांआधी डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने नसा रिलॅक्स होतात. 

रताळे

रताळे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. यातही अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्व भरपूर असतात. तसेच यात नायट्रिक ऑक्साइड असतं. जे नसांना मोकळं करून  ब्लड सर्कुलेशन वेगाने करतं.

आंबट फळं

संत्री, लिंबू, चिंचा यांसारख्या आंबट फळांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि फ्लेवोनोइड्स असतात. जे नसांचं आकुंचन कमी करतात. याने ब्लड फ्लो वेगाने होतो. परिणामी हाय बीपीची समस्य होत नाही. याने पुरूषांना खूप फायदा मिळतो.

कलिंगड आणि द्राक्ष

कलिंगडाचे आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे होतात. यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. यात एक असंही तत्व असतं ज्याने नसा मोकळ्या होतात. तसेच द्राक्षांमध्ये प्लेटलेट्सना मदत करणारे काही तत्व असतात. ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होत नाही आणि ब्लड फ्लो वेगाने होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य