१५५ जणांवर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

नांदेड- लॉयन्स क्लब नांदेड, आयुर्वेदिक रुग्णालय व जिल्हा केमिस्ट्र ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.शरदकुमार दिक्षीत यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत तीन दिवसीय शिबिरात १५५ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

155 free plastic surgeries | १५५ जणांवर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया

१५५ जणांवर मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया

ंदेड- लॉयन्स क्लब नांदेड, आयुर्वेदिक रुग्णालय व जिल्हा केमिस्ट्र ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.शरदकुमार दिक्षीत यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत तीन दिवसीय शिबिरात १५५ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
नांदेड येथील आर्युवेदिक रुग्णालयात बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस शिबीर घेतले. यासाठी १७५ रुग्णांनी नोंदणी केली होती. पैकी पहिल्या दिवशी ४०, दुसर्‍या दिवशी ६५ तर तिसर्‍या दिवशी ५० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याशिवाय २५ रुग्णांना लॉयन्स क्लबतर्फे औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रियेसाठी पाठविलेे.
या शिबिरात दुभंगलेले ओट, दुंभगलेले कान, तिरके डोळे, पापण्याचे विकार, चहर्‍यावरचे मस आणि वृण, दोन्ही बोटाच्या मध्ये गॅप असणे, डोक्यावरच्या गाठी, हातावर व पायावर असलेल्या गाठी, जन्मत: काळे वृण, मोठ-मोठ्या जन्मखूना अशा विविध आजारावरच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात नांदेड जिल्ह्यासह, हिंगोली, परभणी, यवतामाळ, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातून रुग्ण आले होते.
यामुळे खर्‍या गरजूवंत व अर्थिक परिस्थीती बिकट असलेल्या रुग्णांना याचा लाभ झाला. सदर रुग्णांवर अमेरिकेचे प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विजय मोराडीया यांनी शस्त्रक्रिया केल्या. त्यांना लॉयन्स क्लब तसेच आयुर्वेदिक महाविद्यालय व ड्रगिस्ट ॲन्ड केमिस्ट असोसिएशनचे सहकार्य लाभले.
शिबीर यशस्वीतेसाठी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष अमोल बलदवा, सचिव डॉ.मनोज कासलीवाल, कोषाध्यक्ष शिवप्रसाद टाक, चेअरमन संजय सारडा, डॉ.शिवकुमार पवार, नित्यानंद मैया, आयुर्वेदिक रुग्णालयाचे डॉ.ए.बी.देशमुख, डॉ. ए.खान, शल्यचिकित्सक डॉ.अन्नपुरे, डॉ.जांगिड, डॉ.शिवप्रसाद राठी, डॉ.राठोड, डॉ.कल्पना वाकोडे, डॉ.लक्ष्मीकांत बजाज गणेश कल्याणकर,दिपक रंगनानी, रामप्रसाद राठी, राजेश धूत, संजय बाहेती, ओम मानधने, अनिल तोष्णीवाल, सुनील भारतीया आदींनी परिश्रम घेतले. शुक्रवारी समारोपाचा कार्यक्रम घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: 155 free plastic surgeries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.