१५.. रामटेक... जोड

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:04+5:302015-02-16T21:12:04+5:30

या वसतिगृहातील काही मुलींना उलट्या, हगवण आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे कळल्याने धुर्वे, गोंगले व वंजारी आणि अधीक्षक शिवप्रसाद कुमरे व आरोग्यसेवक रामकृष्ण कुबडे यांनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालय गाठले. सदर पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले तेव्हा मुलींजवळ कुणीही कर्मचारी नव्हते. थोड्या वेळाने गार्ड आला आणि त्यानंतर काही वेळाने गृहपाल भोगे तिथे पोहोचल्या. या वसतिगृहातील अन्य पाच मुलींवर या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांना सुटी देण्यात आली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. भरती करण्यात आलेल्या मुलींना गॅस्ट्रोची लागण झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)

15. Ramtek ... add | १५.. रामटेक... जोड

१५.. रामटेक... जोड

वसतिगृहातील काही मुलींना उलट्या, हगवण आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे कळल्याने धुर्वे, गोंगले व वंजारी आणि अधीक्षक शिवप्रसाद कुमरे व आरोग्यसेवक रामकृष्ण कुबडे यांनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालय गाठले. सदर पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले तेव्हा मुलींजवळ कुणीही कर्मचारी नव्हते. थोड्या वेळाने गार्ड आला आणि त्यानंतर काही वेळाने गृहपाल भोगे तिथे पोहोचल्या. या वसतिगृहातील अन्य पाच मुलींवर या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांना सुटी देण्यात आली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. भरती करण्यात आलेल्या मुलींना गॅस्ट्रोची लागण झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)
---------चौकट------
दूषित पाण्याची शक्यता
गॅस्ट्रो हा आजार मुख्यत: पाण्यामुळे होतो. या वसतिगृहाच्या परिसरात नव्यानेच खोदण्यात आलेल्या बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. ते पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याबाबत अद्यापही खात्री करण्यात आली नाही. त्यामुळे सदर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना सभापती किरण धुर्वे यांनी केली. या वसतिगृहाच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव असून, सर्वत्र अन्नाची शिते पडली असल्याचे आढळून आले. शिवाय, या वसतिगृहात कर्मचाऱ्यांनी कमतरता असून, एकही कर्मचारी मुलींची काळजी घेत नाही. वसतिगृहातील दाररहित खोल्यांमुळे मुलींच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
***

Web Title: 15. Ramtek ... add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.