शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

१०३ वर्षाच्या डॉक्टरांनी सांगितलं जास्त जगण्याचं रहस्य, या गोष्टींनी तुम्हीही जगू शकता जास्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:19 IST

जे लोक १०० वर्ष जगतात ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांमध्येच असते.

कुणालाही असंच वाटत असतं की, त्यांनी जास्तीत जास्त जगावं. १०० वर्ष जगावं असंही अनेकांना वाटतं. पण  आजकालची लाइफस्टाईल, खाणं-पिणं इतकं बदललं आहे की, १०० वर्ष जगण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. पण जे लोक १०० वर्ष जगतात ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांमध्येच असते. जेणेकरून त्यांनाही त्या गोष्टी फॉलो करून इतकं जगता यावं. तर १०० वर्ष कसं जगता येईल हे एका १०० वर्षाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

महिला डॉक्टर ग्लेडिस मॅकगॅरी यांचं वय १०३ वर्ष आहे. या वयातही त्या फार अॅक्टिव आहेत. डॉ. ग्लेडिस यांनी 'द वेल लिव्ड लाइफ : ए १०३ ईअर ओल्ड डॉक्टर्स सीक्रेट्स टू हेल्थ अॅन्ड हॅपीनेस अॅट एवरी एज' नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि यात त्यांनी जास्त आयुष्य जगण्याचे सीक्रेट्स सांगितले आहेत. 

अशात डॉक्टर ग्लेडिस यांच्या इतकं जगण्याचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याद्वारे तुम्हालाही कसं जास्त जगता येईल हे जाणून घेता येणार आहे.

नवीन शिकत रहा

डॉ. ग्लेडिस यांनी सांगितलं की, आपल्यापैकी सगळ्यांनी काहीना काही नवीन शिकणे, पुढे जाणे आणि आपल्या क्वालिटी वाढवण्याचं काम केलं पाहिजे. यामुळे तुम्ही सजग राहता. 

स्वत:वर प्रेम करा

एका रिसर्चनुसार, जगात प्रत्येक दोनपैकी एक व्यक्ती डिप्रेशनचा शिकार आहे. हे लोक स्वत:वर फार कमी प्रेम करतात. त्यामुळे जास्त जीवन जगण्यासाठी आधी तुम्ही स्वत: प्रेम करायला शिका.

एनर्जी वाया घालवू नका

डॉ. ग्लेडिस यांच्यानुसार, तुमची एनर्जी अशा गोष्टीवर घालवा जी गोष्ट तुम्हाला आवडते किंवा आनंद देते. हे काही फार अवघड काम नाही. जेव्हा या पद्धतीने आपण जीवन जगत असतो तेव्हा खरंच आपण जीवन जगत असतो. 

काय खावे?

प्लांट बेस्ड डाएट फॉलो केली पाहिजे. म्हणजे झाडांपासून बनलेले पदार्थ हिरव्या पालेभाज्या, फळं इत्यादींचं सेवन केलं पहिजे. तसेच भरपूर पाणी प्यायला हवं. याने तुमचं आयुष्य वाढू शकतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य