पाणी बचतीसाठी जि.प.चा पुढाकार

By Admin | Updated: June 1, 2016 02:15 IST2016-06-01T02:15:13+5:302016-06-01T02:15:13+5:30

‘पाणी जीवनाला फुलविणारे आहे, त्याला विनाशापासून वाचवा’ असा संदेश जिल्हा परिषद देत आहे.

ZP's initiative for saving water | पाणी बचतीसाठी जि.प.चा पुढाकार

पाणी बचतीसाठी जि.प.चा पुढाकार

अध्यक्षांचा सहभाग : कर्मचारी करणार जलबचतीचा संकल्प
गोंदिया : ‘पाणी जीवनाला फुलविणारे आहे, त्याला विनाशापासून वाचवा’ असा संदेश जिल्हा परिषद देत आहे. यंदा जि.प.च्या इमारतीवर पडणारे पाणी जमिनीत मुरविण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला असून जि.प.च्या मागील भागात असलेल्या खड्ड्यात ते पाणी मुरविले जाणार आहे. लोकमतच्या जलमित्र अभियानाने प्रेरित होऊन हा संकल्प केला आहे.
पाण्याची बचत करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पाणी अडवा पाणी जिरवा तसेच अनेक उपक्रम राबविण्यात येतात, परंतु पावसाळ्यात जिल्हा परिषदेच्या छतावर पडणारे पाणी वाहून जाते. परंतू आता असे होणार नाही. छतावर पडणारे पाणी पाईपव्दारे खाली आणण्यात येईल. जि.प. इमातीच्या मागे एक मोठा खड्डा आधीच तयार केला आहे. परंतु त्या खड्ड्यात कचरा व माती असल्याने त्याला खोल करून पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. मंगळवारी (दि.३१) स्वत: जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, जि.प.सदस्य रमेश अंबुले, ठाणा येथील जि.प. सदस्य शोभीलाल कटरे, सामान्य प्रशासन विभागाने उपमुख्य कार्यपालन अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी छताची पाहणी केली. पाण्याची बचत करण्यासाठी पावसाचे छतावर पडणारे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी (रेन वॉटर हार्वेस्टींग) तयारी सुरू केली आहे. जि.प.च्या इमारतीचे छत ८ ते १० हजार स्केअर फूटामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होईल.

अखेर नळाला बसविल्या तोट्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत अनेक ठिकाणी नळ आहेत. या ठिकाणी कर्मचारी अधिकारी यांच्या बरोबर कामासाठी जि.प. मध्ये येणारे लोकही लघुशंकेकरीता किंवा शौचालयात जातात. परंतू नळाच्या तोट्या अनेक दिवसांपासून तुटल्या असताना त्याच्या दुरूस्तीकडे कोणाचे लक्ष नव्हते. त्यामुळे पाणी वाया जात होते. पाणी रोखण्यासाठी प्रत्येक नळाला तोट्या बसविण्यात आल्या आहेत.

Web Title: ZP's initiative for saving water