जि.प. केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथील शिक्षकांचे पद भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:39+5:302021-09-17T04:34:39+5:30
केशोरी : अर्जुनी मोरगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद केंद्र प्राथ. शाळा केशोरी येथे अनेक दिवसांपासून शिक्षकाचे एकपद रिक्त ...

जि.प. केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथील शिक्षकांचे पद भरले
केशोरी : अर्जुनी मोरगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद केंद्र प्राथ. शाळा केशोरी येथे अनेक दिवसांपासून शिक्षकाचे एकपद रिक्त होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांचे रिक्त पद त्वरित भरण्यात यावे, अशी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुणेश काडगाये यांनी ठरावानिशी मागणी केली होती. याप्रकरणी पंचायत समिती शिक्षण विभाग अर्जुनी मोरगाव यांनी दखल घेऊन जी.के. बिसेन स.शि. या शिक्षकांना बदली अंतर्गत पाठवून पद भरले आहे.
जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथील एका शिक्षकाचे कोरोना आजाराने निधन झाले होते. तेव्हापासून येथील शिक्षकाचे एक पद रिक्त होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण प्रणाली आणि सेतू शिक्षण प्रणाली प्रकल्प राबविण्यासाठी अडचण निर्माण होत होती. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून रिक्त शिक्षकाचे पद त्वरित भरण्यात यावे, अशी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुणेश काडगाये यांनी ठराव घेऊन लोकमत वृतपत्राच्या माध्यमातून पंचायत समिती प्रशासनाकडे मागणी केली होती. त्या लोकमत वृत्तपत्रातील मागणीची तालुका प्रशासनाने दखल घेऊन येथील जि.प. प्राथमिक शाळेत गडचिरोली जिल्ह्यातून स्थानांतर होऊन आलेले शिक्षक जी.के. बिसेन यांना येथे रुजू करून घेण्यात आले. पंचायत समिती प्रशासनाने शिक्षकाचे त्वरित पद भरल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी पंचायत समिती प्रशासनाचे आभार मानले आहेत.